• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

बर्ड फ्ल्यूच्या धोक्याने प्रशासन अलर्ट; उपमहापौरांची तातडीची बैठक

जळगाव शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग; आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 8, 2026
in जळगाव, महापालिका, समस्या
बर्ड फ्ल्यूच्या धोक्याने प्रशासन अलर्ट; उपमहापौरांची तातडीची बैठक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : नवापूर परिसरातील पोल्ट्री उद्योगांमध्ये बर्ड फ्ल्यू (एव्हियन इन्फ्लूएंझा) संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. शहरात कोणत्याही परिस्थितीत बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

बैठकीत शहरातील चिकन मार्केट, पोल्ट्री फार्म, मांस विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविणे, संशयित किंवा मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे तसेच बाधित भागातून येणाऱ्या पोल्ट्री वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय चिकन मार्केट, कत्तलखाने व पोल्ट्री परिसरात नियमित सॅनिटायझेशन व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे, अस्वच्छता आढळल्यास तत्काळ कारवाई करणे आणि संशयित परिस्थितीत त्वरित तपासणी करणारी विशेष पथके तयार करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.

नागरिकांमध्ये अफवा पसरू नयेत यासाठी जनजागृती मोहीम राबविणे, पूर्ण शिजवलेले अन्न सेवन करण्याचे आवाहन करणे तसेच बाजार परिसरात सूचना फलक व माहितीपत्रके लावण्याचे निर्देश देण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी मृत पक्षी आढळल्यास त्यांची तातडीने वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी २४ तास सतर्क राहावे, असे आदेश बैठकीत देण्यात आले. रुग्णालयांना देखील ताप, श्वसन त्रास किंवा संसर्गासारखी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची तत्काळ तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले की, “जळगावकरांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

दरम्यान, सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून दररोजचा आढावा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्यउपमहापौरपोटरी फॉर्मप्रशासनबर्ड फ्ल्यूबैठकमहापालिकासतर्क
Previous Post

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा

Next Post

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif