• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

कासोद्यात बोगस बियाणे रॅकेटचा भांडाफोड; वाहनासह लाखोंचा माल जप्त

चारचाकीतून सुरू होती प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांची वाहतूक; कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 8, 2026
in क्राईम, जिल्हा
कासोद्यात बोगस बियाणे रॅकेटचा भांडाफोड; वाहनासह लाखोंचा माल जप्त
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बोगस HTBT कापूस बियाण्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर टाकलेल्या धाडीत तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांच्या बोगस कापूस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला. वाहनासह एकूण लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कृषी विभागाला कासोदा परिसरात छुप्या पद्धतीने HTBT प्रतिबंधित कापूस बियाण्यांची विक्री आणि वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार ७ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचत संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान ‘प्रीमियम रिसर्च हायब्रीड कॉटन सीड’, ‘श्री गणेशा +5G’ आणि ‘आकाश +5G’ नावाची प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांची ४०० पाकिटे जप्त करण्यात आली. ही बियाणे आठ पोत्यांमध्ये भरून वाहतूक केली जात होती. जप्त बियाण्यांची किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय बियाणे वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली. वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे १० लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

या प्रकरणी योगेश बळवंत पाटील (रा. सौंदाणे, जि. जळगाव) आणि नितीन देवरे (रा. वाडीभोकर, जि. धुळे) यांच्या विरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकारी निखिल टोळकर यांच्या फिर्यादीवरून बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, कृषी अधिकारी निखिल टोळकर, परेश बडगुजर, सचिन पाटील तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या पथकाने केली. वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम पार पडली.

बातमी शेअर करा !
Tags: HTBT बियाणेकापूसबियाणेकासोदाकृषीविभागजळगावबोगसबियाणे
Previous Post

खतसाठा आणि कृषी केंद्राची अचानक तपासणी!

Next Post

पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त करा, धोकादायक झाडे हटवा : महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला कडक आदेश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त करा, धोकादायक झाडे हटवा : महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला कडक आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif