• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

खतसाठा आणि कृषी केंद्राची अचानक तपासणी!

सीईओ करिष्मा नायर ॲक्शन मोड मध्ये ; अनियमितता आढळल्यास कारवाईचा इशारा!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 8, 2026
in जळगाव ग्रामीण, तपासणी
खतसाठा आणि कृषी केंद्राची अचानक तपासणी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज Live न्यूज नेटवर्क

जळगाव –  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवारी जळगाव तालुक्यात अचानक धडक तपासणी मोहीम राबवली. किनोद येथील भावना कृषी सेवा केंद्रात जाऊन त्यांनी खत विक्री व्यवस्थेची प्रत्यक्ष पडताळणी केली.

तपासणीदरम्यान करिश्मा नायर यांनी पॉस मशीनमधील विक्री नोंदी तपासल्या. तसेच खतांचे बिल बुक, साठा नोंदवही आणि खत परवान्यांची बारकाईने छाननी केली. शेतकऱ्यांना खत वितरणात कोणतीही हलगर्जीपणा किंवा अनियमितता सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“खत वितरणात गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.

यानंतर त्यांनी कानळदा रोडवरील गोल्डन ट्रान्सपोर्ट येथे साठवून ठेवण्यात आलेल्या सुमारे १५० टन युरिया खतांच्या बफर साठ्याचीही अचानक पाहणी केली. साठा उपलब्धता, वितरण प्रक्रिया आणि नोंदींची प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या धडक तपासणी मोहिमेदरम्यान कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच कृषी अधिकारी धीरज बढे उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: करिष्मा नायरकृषी विभागखत वितरणखरीप हंगामजळगावयुरिया साठा
Previous Post

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन!

Next Post

कासोद्यात बोगस बियाणे रॅकेटचा भांडाफोड; वाहनासह लाखोंचा माल जप्त

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कासोद्यात बोगस बियाणे रॅकेटचा भांडाफोड; वाहनासह लाखोंचा माल जप्त

कासोद्यात बोगस बियाणे रॅकेटचा भांडाफोड; वाहनासह लाखोंचा माल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif