• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

​महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप!

उपमहापौर, सभापती, अधिकाऱ्यांसह केली पाहणी ; महात्मा फुले यांचा पुतळा अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 5, 2026
in जळगाव, महापालिका
​महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

​जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या महात्मा फुले मार्केट येथील व्यापारी असोसिएशनने मागील आठवड्यात महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देऊन तेथील समस्यांविषयी अवगत केले होते. या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवार, ५ मे रोजी दुपारी १२ वाजता फुले मार्केटला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात महापौरांनी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, कडक कारवाईचे आदेश दिले.

​

​या पाहणी दौऱ्यादरम्यान उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, स्वीकृत नगरसेवक तथा फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, मनपा उपायुक्त पंकज गोसावी, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, विद्युत विभागाचे प्रमुख संदीप मोरे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, तसेच बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि हॉकर्स असोसिएशनचे नंदू पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महापौरांचे कडक निर्देश आणि आक्रमक भूमिका

​अतिक्रमण धारेवर: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याभोवतीचे मोठे अतिक्रमण पाहून महापौर संतापल्या. “सर्व पुतळे अतिक्रमणमुक्त करून त्यांनी श्वास घेतला पाहिजे, असे आदेश असतानाही येथे अतिक्रमण कसे?” असा सवाल करत, तात्काळ उद्यापासून कारवाई करून पुतळा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

​पोलिस बंदोबस्ताचा वापर: सेंट्रल फुले मार्केट येथील अतिक्रमण काढण्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत, “तुमचे काहीच नियोजन नाही का? वेळ पडली तर पोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण काढा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

​अनधिकृत वायरिंग व शेडवर कारवाई: मार्केटमधील अनधिकृत वायरिंगचे कनेक्शन तात्काळ तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, बुधवारी सकाळी हे कनेक्शन तोडण्यात येऊन अवैधरित्या बांधलेल्या ताडपत्री व ग्रीन शेडनेटचे कापड काढले जाणार आहेत. तसेच मार्केटमधील रस्त्यावर असलेल्या जड-अवजड पेट्याही उचलल्या जातील.

 

​दुकानदारांवर कारवाईचा इशारा: जो दुकानदार विनापरवाना हॉकर्सला जागा उपलब्ध करून देईल, त्याचा परवाना तात्काळ रद्द केला जाईल, असा इशारा महापौरांनी दिला. ​हॉकर्सची वाढती संख्या: मार्केटमध्ये २०० ते ३०० हॉकर्स नोंदणीकृत असताना, प्रत्यक्षात त्यांची संख्या हजाराच्या आसपास गेल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. हॉकर्ससाठी पर्यायी जागा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

स्वच्छता, पाणी आणि पार्किंगबाबतच्या सूचना

​शौचालयांची स्वच्छता: मार्केटमधील बंद असलेले शौचालय सुरू करून संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

​कचरा व्यवस्थापन: सर्व व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून कचरा त्यातच टाकावा. सकाळी ८ वाजेपर्यंत घंटागाडी येईल, त्यानुसार कचऱ्याचे नियोजन करण्यात येईल.

​पार्किंग व पाणीपुरवठा: नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा मोकळी ठेवण्यास सांगण्यात आले. तसेच, मार्केटमधील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी प्राथमिक उपाययोजना त्वरित करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

 

दरम्यान, काही दुकानदार व नागरिकांनी पैसे घेऊन हॉकर्सला जागा दिल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. यावर महापौरांनी, पुराव्यानिशी आयुक्त व महापौरांच्या नावाने अर्ज देण्याचे आवाहन केले आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या या धडाक्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. फुले मार्केट या धडक कारवाईनंतर श्वास घेणार असल्याचे चित्र आहे.

​

बातमी शेअर करा !
Tags: अतिक्रमणउपमहापौरजळगावदीपमाला काळेफुले मार्केटमहानगरपालिकामहापौरव्यापारी
Previous Post

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif