• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कायदा

जळगावात नवीन भारतीय न्याय संहितेबाबत पत्रकार कार्यशाळा संपन्न

पोलीस प्रशासनाकडून माध्यम प्रतिनिधींना कायद्यातील बदल व आधुनिक उपाययोजनांचे सविस्तर मार्गदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 3, 2026
in कायदा, जळगाव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

देशातील न्यायप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) आणि जुन्या कायद्यांमधील फरक तसेच नव्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात विशेष पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धारबडे यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना नवीन कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

ब्रिटीशकालीन कायद्यांऐवजी भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन कायदे लागू करण्यात आले असून, यामुळे न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर, गुन्ह्यांचे नव्याने वर्गीकरण तसेच शिक्षेच्या तरतुदींमधील बदल यावर पोलीस प्रशासनाकडून सादरीकरण करण्यात आले.

या कार्यशाळेला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील (वेब न्यूज पोर्टल्स व सोशल मीडिया) प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पत्रकारांच्या शंकांचे निरसन करताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, कायद्याची अचूक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हे पोलीस आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत.

या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय अधिक दृढ झाला असून, नवीन कायद्यांची अंमलबजावणी करताना नागरिकांना होणारे फायदे आणि पारदर्शकतेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. जळगाव पोलीस दलाच्या या संवादात्मक आणि पारदर्शक भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: BNS कायदाजळगाव पोलीसनवीन कायदेपत्रकार कार्यशाळापोलीस प्रशासनभारतीय न्याय संहिता
Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

Next Post

जळगावात नवीन भारतीय न्याय संहितेवर पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगावात नवीन भारतीय न्याय संहितेवर पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif