• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मृत्यूच्या दारातून परतला जीव; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांची शर्थ; कुटुंबीयांच्या तत्परतेमुळे तरुणाला नवजीवन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 30, 2026
in Uncategorized, आरोग्य, जळगाव
मृत्यूच्या दारातून परतला जीव; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केलेल्या २१ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले असून, त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे हा तरुण मृत्यूच्या दारातून परतला आहे. ही घटना केवळ वैद्यकीय कौशल्याचीच नव्हे तर कुटुंबीयांच्या सतर्कतेचीही जाणीव करून देणारी ठरली आहे.

याबाबत माहिती अशी की, सावदा येथील भूषण पाटील (वय २१) या तरुणाला गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मद्यपानाची सवय लागली होती. कालांतराने त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो घरच्यांशी संवाद टाळू लागला, एकट्याने राहण्याची सवय त्याला लागली आणि मानसिक तणाव वाढत गेला. या परिस्थितीत त्याने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच त्याच्या बहिणीने प्रसंगावधान दाखवत तातडीने त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला तत्काळ एमआयसीयू (मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये हलविण्यात आले. याठिकाणी एमआयसीयूचे प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पूजा तन्नीरवार, डॉ. विनय बुराडकर, डॉ. ललितकुमार, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. आसावरी देशपांडे, डॉ. सौरभ मुळे, डॉ. तन्मय मेहता, डॉ. लुसी थॉमस या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने वेळ न दवडता उपचार सुरू केले.रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. या कालावधीत डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि तांत्रिक कर्मचारी यांनी अत्यंत दक्षतेने उपचार केले. योग्य औषधोपचार आणि सातत्यपूर्ण देखरेखीमुळे रुग्णाने हळूहळू प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. प्रकृतीत सुधारणा होताच त्याला व्हेंटीलेटरवरून काढण्यात आले आणि पुढील उपचार सुरू ठेवण्यात आले.सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे. या यशस्वी उपचारामुळे कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

मानसिक तणाव, एकटेपणा आणि व्यसनाधीनता यामुळे अनेक तरुण टोकाचे निर्णय घेतात. अशा वेळी कुटुंबीयांनी वेळेत लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असते. या प्रकरणात बहिणीने दाखवलेली तत्परता रुग्णाचा जीव वाचवण्यात निर्णायक ठरली. योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाल्यास गंभीर अवस्थेतूनही रुग्णाला वाचवता येते. कुटुंबीयांनी संवाद वाढवणे, भावनिक आधार देणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कुटुंबीयांच्या जागरूकतेमुळे एका तरुणाला नवजीवन मिळाले आहे.

– डॉ. ललितकुमार, निवासी डॉ.उल्हास पाटील रूग्णालय

.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्यजळगावमानसिक आरोग्यवैद्यकीय उपचारव्यसनमुक्तीसामाजिक जागरूकता
Previous Post

‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

Next Post

भाजपा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भाजपा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती

भाजपा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif