• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

महापौरांचे ना. गिरीश महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 30, 2026
in जळगाव, महापालिका
‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या आणि अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रीज (ROB) ते सिंधी कॉलनी रिंग रोड परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या रस्त्यावरील धोकादायक ठरणाऱ्या ‘ओव्हर हेड’ विद्युत तारा आणि खांब हटवून संपूर्ण यंत्रणा भूमिगत करण्यासाठी महापौर दिपमाला मनोज काळे यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी ४५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी त्यांनी राज्याचे मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे.

वाहतूक कोंडी फुटणार, अपघात टळणार

जळगाव शहरात प्रवेश करताना पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनी हा रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सद्यस्थितीत या रस्त्याच्या मध्यभागी (सेंट्रल लाईन) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब, रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि उच्च व लघुदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असून अपघाताची भीतीही कायम असते.

असे होणार फायदे

रस्ता रुंदीकरण: विद्युत खांब भूमिगत झाल्यामुळे रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी वाढणार असून वाहतूक सुलभ होईल.

प्रखर प्रकाश व्यवस्था: यंत्रणा भूमिगत झाल्यावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांसाठी अद्ययावत आणि प्रखर पथदिवे लावणे सोयीचे होईल.

सौंदर्यीकरण: ओव्हर हेड वायर्सचे जाळे गायब झाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडेल.

४५ कोटींचा निधी अपेक्षित

महापौरांनी दिलेल्या पत्रानुसार, महावितरण कंपनीकडून या कामाचा प्राथमिक अंदाज घेतला असता, यासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी विशेष अनुदान म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती महापौरांनी पत्राद्वारे ना. गिरीश महाजन यांना केली आहे.

यावेळी महापौर दीपमाला काळे यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज काळे, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, नंदकुमार अडवाणी आदी उपस्थित होते.

“शहरातील मुख्य रिंग रोडवरील विद्युत यंत्रणा भूमिगत झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल. शासन स्तरावरून या निधीसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.”

— दिपमाला मनोज काळे, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका.

बातमी शेअर करा !
Tags: गिरीश महाजनजळगाव रिंग रोडजळगाव विकासपिंप्राळा ROBविद्युत यंत्रणा भूमिगतसिंधी कॉलनी
Previous Post

अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next Post

मृत्यूच्या दारातून परतला जीव; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मृत्यूच्या दारातून परतला जीव; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif