नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव महापालिकेतील बहुचर्चित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे.बुधवारी मुंबईत वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगाव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

या प्रकरणासंदर्भात नगरसेवक अरविंद देशमुख यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात मनपाची आर्थिक फसवणूक, विश्वासघात, कोट्यवधीचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप केले आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे व तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यात प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना संपर्क साधून सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे अटलांटा प्रकरणातील तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे.






