• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड व रंजना देशमुख अविरोध निवड

पोटनिवडणुकीत एकमेव नामनिर्देशनामुळे दोघांची निवड; ग्राहकाभिमुख कामावर अध्यक्षांचे मार्गदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 29, 2026
in Uncategorized, जळगाव, स्थानिक बातम्या
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड व रंजना देशमुख अविरोध निवड
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

श्री महावीर सहकारी बँक लि. च्या नवीपेठमधील मुख्यालयात रिक्त झालेल्या संचालकपदासाठी २६ एप्रिल ला पोटनिवडणूक घेण्यात आली. श्री महावीर सहकारी बँकच्या संचालक मंडळातील उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख यांचे निधन झाल्यामुळे व श्वेता चोरडिया यांनी पदत्याग केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगावचे सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले. सभेचा कोरम पुर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम पत्रिकानुसार नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आले. नानासाहेब देशमुख यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सर्वसाधारण मतदार गटातुन स्वरूपकुमार भागचंद लुंकड व महिला मतदार गटातुन रंजना जितेंद्र देशमुख यांचे एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. अध्यासी अधिकारी डी. व्ही. पाटील यांनी दोघं जागांसाठी एकमेव वैध नामनिर्देशन पत्र असल्याने स्वरूपकुमार भागचंद लुंकड व रंजना जितेंद्र देशमुख यांची अविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.

या निवडीबद्दल बँकेचे अध्यक्ष दलीचंदजी हस्तीमल जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, बँकेचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र मयूर, माजी महापौर प्रदीप रायसोनी, जेडीसीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र नानासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी बॅंकेचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, सुभाष लोढा, अशोक खिवसरा, जितेंद्र कोठारी, गुणवंत टोंगळे, रविंद्र गुजराथी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, भास्कर कोळी, आर. जे. पवार, कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर आदी संचालक व सीईओ मनोहर पाटील उपस्थित होते. यावेळी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांनी मनोगत व्यक्त करुन संधी दिल्याबद्दल दलिचंदजी जैन, सुरेशदादा जैन, अशोक जैन व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. पोट निवडणूक प्रक्रिये संबंधित मोलाचे मार्गदर्शन केल्याने डी. व्ही. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार बँकेतर्फे अध्यक्ष दलीचंदजी जैन यांनी मानले.

ग्राहकांशी संवाद महत्त्वाचा- दलिचंदजी जैन

नवनियुक्त संचालकांनी बँकेच्या सर्व शाखांमध्ये नियमित भेटी द्याव्यात. कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधून ग्राहकांना जास्तीत जास्त सेवासुविधा देता येतील यासाठी नवकल्पना सुचवाव्यात, ग्राहक व बँकेच्या हिताचा समन्वय वाढवूून बँकेच्या उत्कर्ष साधावा, असे मोलाचे मार्गदर्शन दलिचंदजी जैन यांनी यावेळी केले.

– श्री महावीर सहकारी बँकेच्या नवीन संचालकांसोबत (डावीकडून) अजेय राखेचा, श्रेयस कुमट, जितेंद्र कोठारी, सुभाष लोढा, डी. व्ही. पाटील, स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख, दलिचंदजी जैन, सागर पगारिया, शांतीलाल बिनायक्या, गुणवंत टोंगळे, भास्कर कोळी, रविंद्र गुजराथी.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावबँक_निवडणूकमहावीर_सहकारी_बँकलुंकडसंचालक_निवडसहकार_क्षेत्र
Previous Post

अटलांटा; महापालिकेची याचिका कोर्टाने फेटाळली

Next Post

पारोळ्यात “एसीबीचा सापळा यशस्वी : २ हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहाथ”!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पारोळ्यात “एसीबीचा सापळा यशस्वी : २ हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहाथ”!

पारोळ्यात “एसीबीचा सापळा यशस्वी : २ हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहाथ”!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif