• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची दुहेरी जबाबदारी; महिला उद्योजकतेला नवे बळ

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 26, 2026
in Uncategorized, जळगाव, व्यवसाय
जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ही देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली व्यापारी संघटना असून, देशभरातील कोट्यवधी व्यापारी व ४०,००० हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करते. व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, धोरणात्मक प्रतिनिधित्व आणि व्यापारवृद्धीसाठी कार्य करणारी ही राष्ट्रीय संघटना आहे.

कॅट आयोजित राष्ट्रीय महिला उद्योजक शिखर परिषद नुकतीच नवी दिल्ली येथील हिंदी भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेत जळगावच्या संगीता पाटील यांनी कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. तसेच त्यांची मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. कॅट च्या इतिहासात प्रथमच एका व्यक्तीकडे राष्ट्रीय स्तरावर दोन महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने हा निर्णय विशेष ठरला आहे.

दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत तसेच कॅट चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि कॅट चे महामंत्री व खासदार प्रविण खंडेलवाल यांच्या दूरदर्शी मार्गदर्शन व प्रभावी नेतृत्वाखाली ही परिषद अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि उल्लेखनीयरीत्या पार पडली.

या परिषदेत देशातील विविध राज्यांमधून ४०० हून अधिक महिला उद्योजक सहभागी झाल्या. महिला उद्योजकता, फायनान्स, स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल सक्षमता, MSME क्षेत्रातील संधी, स्टार्टअप्स व बाजारपेठ उपलब्धता या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

संगीता पाटील यांचा जळगाव जिल्ह्यापासून महाराष्ट्र राज्य आणि पुढे राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. विविध संस्थांमध्ये विविध पदांवर कार्य करत त्यांनी सातत्यपूर्ण, परिणामकारक आणि समाजाभिमुख कार्याचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास आणि स्वावलंबनाच्या दिशेनेही त्यांनी प्रभावी कार्य केले आहे.

आपल्या प्रभावी अध्यक्षीय भाषणात संगीता पाटील यांनी महिला उद्योजकांना संबोधित करत सांगितले की, महिलांमध्ये क्षमता, कौशल्य आणि जिद्दीची कोणतीही कमतरता नाही; त्यांना केवळ योग्य व्यासपीठ आणि संधी मिळणे आवश्यक आहे. कॅट विमेन विंग देशभरातील महिला उद्योजकांना एकत्र आणून सशक्त, संघटित आणि प्रभावी नेटवर्क निर्माण करून महिलांसाठी एक सक्षम व्यासपीठ ठरणार आहे.

“आत्मनिर्भर भारत” आणि “वोकल फॉर लोकल” या संकल्पनांना पुढे नेण्यासाठी महिलांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय नेतृत्व घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल सक्षमता आणि मार्केट लिंकजच्या माध्यमातून महिलांना लोकल ते ग्लोबल बाजारपेठेशी जोडण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी त्यांनी अधोरेखित केले की, देशाच्या लोकसंख्येतील जवळपास ५० टक्के महिला असूनही अर्थव्यवस्थेतील त्यांचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि तो वाढवणे ही राष्ट्रीय गरज आहे.

परिषदेत आदरणीय प्रविणजी खंडेलवाल यांनी कॅट विमेन विंग च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संगीता पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर संगीता पाटील यांनी कॅट विमेन विंगची नवीन संघटनात्मक रचना जाहीर केली, ज्यामध्ये २५ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी तसेच १५ विभागीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली.

या नव्या नेतृत्वासह उभ्या राहिलेल्या संघटनात्मक बळामुळे देशातील महिला उद्योजकतेला नवचैतन्य मिळणार असून, तिचा प्रभाव राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात अधिक ठळकपणे जाणवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

दोन दिवसीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कॅट विमेन विंग चे सर्व पदाधिकारी तसेच कॅट दिल्ली कार्यालयातील संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय, नियोजन आणि समर्पित कार्यामुळे हा भव्य राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत सुव्यवस्थित आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

बातमी शेअर करा !
Tags: कॅटकॅट विमेन विंगजळगाव बातमीमहिला उद्योजकताराष्ट्रीय अध्यक्ष नियुक्तीसंगीता पाटील
Previous Post

JCL T-20अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

Next Post

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif