• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करा; खासदार स्मिता वाघ यांचे निर्देश

जळगाव पंचायत समितीत आढावा बैठक; घरकुल व महिला बचत गटांवर विशेष भर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 8, 2026
in Uncategorized
शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करा; खासदार स्मिता वाघ यांचे निर्देश
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव –  पंचायत समितीत खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत घरकुल, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.

घरकुल योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून निधी वितरित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. “योजना वेळेत पोहोचल्या नाहीत, तर त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो,” असे खासदार वाघ यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी समाजकल्याण, वित्त आयोग, सेस फंड, सिंचन विहीर व गाय-गोठा अनुदान योजनांचा आढावाही घेतला. सर्व योजना पारदर्शक पद्धतीने आणि वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचेही आदेश देण्यात आले.

महिला सक्षमीकरणावर भर देताना बचत गटांना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी झाल्यास गावाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल,” असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

भाजप वर्धापन दिनानिमित्त जळगावात राजकीय हालचालींना वेग; भापसे यांचा पक्षप्रवेश

Next Post

सुदृढ आरोग्यासाठी उत्तम दिनचर्या महत्त्वाची : महापौर दीपमाला काळे 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

सुदृढ आरोग्यासाठी उत्तम दिनचर्या महत्त्वाची : महापौर दीपमाला काळे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif