• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

सुदृढ आरोग्यासाठी उत्तम दिनचर्या महत्त्वाची : महापौर दीपमाला काळे 

जळगाव महानगरपालिकेतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 8, 2026
in Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

सुदृढ आरोग्यासाठी उत्तम दिनचर्या महत्त्वाची : महापौर दीपमाला काळे

 

जळगाव महानगरपालिकेतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: “आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने आपली दिनचर्या उत्तम ठेवली पाहिजे. तसेच विविध लसीकरण वेळेवर करून घेणे गरजेचे आहे. शेवटी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी केले.

 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाच्या वतीने मंगळवार, ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त’ राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

 

या कार्यक्रमाला शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रामुख्याने उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, स्थानिक नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, अर्शिनबानो खाटीक, मुख्य वैद्यकीय अधिकारी: डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. वैभव वारके यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व आणि महानगरपालिकेद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना नागरिकांनी आरोग्याप्रती जागरूक राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलेश अमोदकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

या सोहळ्याला दवाखाना विभागातील विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणी आणि जनजागृतीच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा !
Previous Post

शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करा; खासदार स्मिता वाघ यांचे निर्देश

Next Post

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

April 14, 2026
पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

April 14, 2026
महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

April 13, 2026
व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

April 13, 2026
महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

April 13, 2026
अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

April 13, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif