• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन:

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 5, 2026
in जळगाव, स्वच्छता मोहीम
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : महापौर दीपमाला काळे यांच्या मार्केट साफसफाई अभियान अंतर्गत आणि शहरातील जुन्या व नवीन बी. जे. मार्केटच्या दुरावस्थेबाबत महासभेत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, महापौर दीपमाला काळे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. महापौरांच्या पुढाकाराने दि. २ एप्रिलपासून सुरू झालेले ‘विशेष स्वच्छता अभियान’ रविवारी (दि. ५ एप्रिल) उत्साहात पूर्ण झाले. गेल्या चार दिवसांच्या सातत्यपूर्ण कामामुळे मार्केट परिसराचे रूप पालटले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे.

 

प्रशासकीय यंत्रणा कामाला जुंपली

केवळ स्वच्छताच नव्हे, तर मार्केटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापौरांनी महापालिकेच्या विविध विभागांना कामाचे निर्देश दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांत महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली.

 

*स्वच्छता विभाग*: सलग चार दिवस २० महिला व १५ पुरुष कामगारांच्या मदतीने मार्केटचा कानाकोपरा स्वच्छ करण्यात आला.

*अतिक्रमण विभाग*: मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेले अडथळे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली.

*विद्युत विभाग*: संपूर्ण परिसरात बंद असलेले दिवे सुरू करून नवीन प्रकाश व्यवस्था करण्यात आली. तसेच लिफ्ट कशी बसवता येईल याबाबत पाहणी करण्यात आली.

*बांधकाम विभाग*: तुटलेल्या रेलिंग्स आणि पायऱ्यांच्या दुरुस्तीचे नियोजन सुरू झाले आहे.

 

*दुकानदारांना महापौरांचे आवाहन*

या मोहिमेदरम्यान महापौर दीपमाला काळे यांनी मार्केटमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. “प्रशासनाने स्वच्छतेचा पुढाकार घेतला असला, तरी ही व्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आणि दुकानदारांची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवावी आणि ग्राहकांनी त्यातच कचरा टाकेल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘माझे मार्केट, स्वच्छ मार्केट’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

या स्वच्छता मोहिमेच्या समारोपप्रसंगी सहायक आयुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता समन्वयक रमेश कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर, युनिट प्रमुख अजय चांगरे, वार्ड मुकादम विशाल चांगरे, नितीन जावळे आणि बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“महासभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आम्ही केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. बी. जे. मार्केटचा कायापालट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, पण नागरिकांचा सहभाग हाच या मोहिमेचा खरा आत्मा आहे.”

— दीपमाला काळे, महापौर

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव बातमीदीपमाला काळेबीजे मार्केटमहापालिकामहापौरस्वच्छता मोहीम
Previous Post

शिरसोली परिसरात अवकाळी पाऊस व वादळाचा फटका; पिकांचे मोठे नुकसान

Next Post

भाजप स्थापना दिनानिमित्त ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भाजप स्थापना दिनानिमित्त ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव

भाजप स्थापना दिनानिमित्त ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif