• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापालिकेच्या स्थायीसमितीचा अर्थसंकल्प; ५२:५६ कोटी महसूल वाढीसह विकासकामांना गती!

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी कर वसुलीवर भर देणार - सभापती डॉ चंद्रशेखर पाटील 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 26, 2026
in जळगाव, महापालिका
महापालिकेच्या स्थायीसमितीचा अर्थसंकल्प; ५२:५६ कोटी महसूल वाढीसह विकासकामांना गती!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीचे सभापती यांच्या डॉ.चंद्रशेखर पाटील अध्यक्षतेखाली सादर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, नगररचना सचिव शुक्ला यावेळी उपस्थित होते.

 

या अर्थसंकल्पात शहराच्या पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. भांडवली खर्चामध्ये मोठी वाढ प्रस्तावित करण्यात आली असून ३३.२५ कोटी रुपयांच्या तुलनेत ५३.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

यामध्ये सुमारे १९.९५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शहरातील रस्ते, वीज वाहिन्या स्थलांतर, नवीन विद्युत पोल उभारणी तसेच समांतर रस्त्यांच्या विकासासाठी निधी वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, काही बाबींमध्ये कपातही करण्यात आली असून आरोग्य विभागासाठी वाहन खरेदीत ५ कोटी रुपयांची घट दर्शविण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागासाठीही मोठ्या प्रमाणात निधी वाढविण्यात आला आहे. ६०.७८ कोटी रुपयांच्या तुलनेत ६८.६५ कोटी रुपयांचा अंदाज मांडण्यात आला असून, यामध्ये ७.८६ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच नियमित पाणीपुरवठा खर्चाबरोबरच मलनिस्सारण योजनेसाठीही निधी वाढविण्यात आला आहे.

 

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी कर वसुलीवर भर देणार – सभापती डॉ चंद्रशेखर पाटील

 

एकूणच, महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५२.५६ कोटी रुपयांची महसूल वाढ अपेक्षित असून, विविध विभागांतील खर्च मिळून ५२.४७ कोटी रुपयांची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून जळगाव महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी कर वसुलीवर भर दिला जाईल. व दर तीन महिन्यांनी कर वसुली संदर्भात  ही बैठक घेतली जाईल. असे स्थायी समिती सभापती डॉ चंद्रशेखर पाटील यांनी सभापती दालनात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा !
Tags: अर्थसंकल्पडॉ चंद्रशेखर पाटीलमहापालिकाविकास कामांना गतीस्थायी समितीस्थायी समिती सभापती
Previous Post

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे भव्य हिंदू संमेलन संपन्न

Next Post

पत्रकारांसाठी “प्रीमियर लीग पर्व-२” : सागर पार्क मैदानावर आयोजन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पत्रकारांसाठी “प्रीमियर लीग पर्व-२” : सागर पार्क मैदानावर आयोजन!

पत्रकारांसाठी “प्रीमियर लीग पर्व-२” : सागर पार्क मैदानावर आयोजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

April 14, 2026
पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

April 14, 2026
महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

April 13, 2026
व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

April 13, 2026
महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

April 13, 2026
अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

April 13, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif