• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे भव्य हिंदू संमेलन संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मोठे वाघोदे येथे भव्य हिंदू संमेलन; मिलिंद परांडे यांचे मार्गदर्शन, समाज एकात्मतेवर भर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 25, 2026
in जिल्हा, धार्मिक
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे भव्य हिंदू संमेलन संपन्न
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मोठे वाघोदे (ता. रावेर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त सकल हिंदू समाज चिनावल मंडळाच्या वतीने मोठे वाघोदे येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक विजयकुमार पाटील हे होते. तर प्रमुख उद्घाटक म्हणून विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय संघटन महामंत्री व राष्ट्रीय प्रवक्ते  मिलिंद परांडे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महामंडलेश्वर पवनकुमारदासजी महाराज (खंडोबावाडी देवस्थान, फैजपूर) तसेच प. म. श्री. दिवाकर बाबा शास्त्री (श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम, वाघोदे) हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते श्री. मिलिंदजी परांडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महामंडलेश्वर पवनकुमारदासजी महाराज यांचा सन्माम योगेश भंगाळे तर दिवाकर बाबा शास्त्री यांचा सन्मान केतन पाटील यथोचित गौरव करण्यात आला.

या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव अँटी करुप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया राज्य अध्यक्ष मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन राज्य अध्यक्ष सर्व शक्ती सेना हिंदुत्ववादि संघटना राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे तसेच भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल महाजन यांनी विश्वहिंदू परिषद केंद्रीय संघटन महामंत्री यांचा ‘जय हिंद, वंदे मातरम्’ लिहिलेला मफलर, पेन व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम’ हे पुस्तक सरनेह सप्रेम भेट दिले.

मनोगत व्यक्त करताना महामंडलेश्वर पवनकुमारदासजी महाराज यांनी हिंदू समाजातील जातीय भेदभाव, मतभेद व संघर्ष दूर होऊन समाज एकसंध व समरस व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर श्री. मिलिंदजी परांडे यांनी हिंदू संमेलनाच्या माध्यमातून समाजात एकात्मता, भारतीय संस्कृतीचे जतन व सामाजिक बांधिलकी वाढविणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमाला राहुल महाजन, स्वप्नील पवार, कांतीलाल महाजन, डॉ. गुरुदत्त पाटील, बाळू महाजन, गंभीर महाजन, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, कमलाकर माळी, दत्ता पाटील, मेघनाथ पाटील, कृष्णा पाटील, हर्षल पाटील, सनी मोरे यांच्यासह विविध शाळांतील विद्यार्थी- विद्यार्थिनी, चिनावल मंडळातील आठ गावांतील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक कुलभूषण पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्नील पवार यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Tags: आरएसएसधार्मिकराष्ट्रीय स्वयंसेवक संघसंत महात्म्यहिंदू संमेलन
Previous Post

जळगावात नवराज्य Live सम्राज्ञी पुरस्कारांनी महिलांचा गौरव!

Next Post

महापालिकेच्या स्थायीसमितीचा अर्थसंकल्प; ५२:५६ कोटी महसूल वाढीसह विकासकामांना गती!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापालिकेच्या स्थायीसमितीचा अर्थसंकल्प; ५२:५६ कोटी महसूल वाढीसह विकासकामांना गती!

महापालिकेच्या स्थायीसमितीचा अर्थसंकल्प; ५२:५६ कोटी महसूल वाढीसह विकासकामांना गती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif