• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

पत्रकारांसाठी “प्रीमियर लीग पर्व-२” : सागर पार्क मैदानावर आयोजन!

२६ संघांचा सहभाग, ४ दिवसीय स्पर्धा, खेळाडूंना मोफत चहा-जेवण व आकर्षक बक्षिसे

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 26, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
पत्रकारांसाठी “प्रीमियर लीग पर्व-२” : सागर पार्क मैदानावर आयोजन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, दि.२६ : समाजाचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या मनोरंजन व कल्याणासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेत, “पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२” चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदान येथे पार पडणार असून उद्या (दि. २६) सकाळी ७ वाजता स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

 

पत्रकार दिवसरात्र ऊन, वारा, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता समाजासाठी कार्यरत असतात. मात्र त्यांच्या मनोरंजनाकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन पत्रकारांमध्ये सुसंवाद, मैत्री आणि खेळाडूवृत्ती वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या स्पर्धेत जिल्हाभरातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग असून एकूण २६ संघ मैदानात उतरणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १४ संघ, जळगाव शहरातील ५ संघ, संपादकांचा एक संघ तसेच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, डॉक्टर, वकील, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाचे संघ सहभागी होणार आहेत.

 

उद्या सकाळी ७ वाजता केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील , मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे

 

विशेष म्हणजे, या ४ दिवसीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही खेळाडूकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. समारोप सोहळ्यात विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

 

ही स्पर्धा यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी आयोजकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असून जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: क्रिकेट स्पर्धाजळगाव सागर पार्कपत्रकारप्रीमियर लीगसागर पार्क
Previous Post

महापालिकेच्या स्थायीसमितीचा अर्थसंकल्प; ५२:५६ कोटी महसूल वाढीसह विकासकामांना गती!

Next Post

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह !

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif