
नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : नवराज्य लाईव्हतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा ‘नवराज्य सम्राज्ञी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २२ रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडला. दैनिक पुण्यनगरी मीडिया पार्टनर होते.
या सोहळ्याला चांडक कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश चांडक, आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित भंगाळे, मॉडेल व अभिनेत्री तसेच आर्वी एंटरटेनमेंटच्या संस्थापक रुपा शास्त्री, ‘पुण्यनगरी’चे संपादक राजेंद्र पाटील, सहव्यवस्थापक महेंद्र माळी, प्रा.सुनील गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कॅन्सरच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली
यावेळी बोलताना डॉ. निलेश चांडक यांनी सांगितले की, आजच्या काळात महिलांनी शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला आदी सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. पूर्वी महिलांची संख्या व सहभाग मर्यादित होता, मात्र आता त्या प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. महिलांनी व्यावसायिक यशासोबतच कुटुंबाच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. बाहेरच्या अन्नापेक्षा घरगुती आहाराचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सध्याच्या काळात तरुणांमध्ये वाढत असलेल्या कॅन्सरच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली.

डर्माट्रिक्स कार्यक्रमाचे मुख्यप्रयोजक होते. तर जैन इरिगेशन, महादेव हॉस्पीटल, के. सी. ई., चांडक कन्सर हॉस्पीटल, शाहू हॉस्पीटल व आनंद हॉस्पीटल सह प्रयोजक होते. महेंद्र माळी, रुपा शास्त्री, सुनील गरुड यांनी मनोगत व्यक्त केले.
नवराज्य लाईव्हचे संपादक योगेश सुने यांनी प्रास्ताविक केले. संदीप केदार यांनी सुत्रसंचालन केले.

अभ्यास अन् आरोग्य महिलेचा हाती
डॉ. अमित भंगाळे यांनीही महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना सांगितले की, कुटुंबाच्या प्रगतीत महिलेचा मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक महिलेनं मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही सक्षमपणे पार पाडावी. अभ्यास आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी महिलेच्या हाती आहेत, असे त्यांनी नमूद केले.

यांना मिळाला नवराज्य सम्राज्ञी पुरस्कार
पाळधी येथील नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा अर्चना प्रशांत सूर्यवंशी, सिंगनूर, ता. रावेर येथील मायाताई संजय मोरे, निमजाई फाउंडेशनच्या
अध्यक्ष शितलताई भूषण बाक्षे -पाटील, शिरसोली येथील माजी पंचायत समिती सदस्य लताताई दिगंबर बारी, जयश्री मुरलीधर पाटील, एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम

स्कूलच्या प्राचार्या जयश्री मुरलीधर पाटील, शिक्षण क्षेत्र पौर्णिमा लक्ष्मण देशमुख, वास्तू विशारद, डॉ. श्रीमती आकांक्षा कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका युती अध्यक्षा ऐश्वर्या प्रशांत साळुंखे, आर. जे. शुभांगी बडगुजर, जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या संचालिका सविता दिलीप वाणी, सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई मराठे, एस. व्ही. लोखंडे.








