• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

ठिबकवरील असंख्य पिकांची शिवराज सिंह चौहान यांच्याकडून पाहणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 20, 2026
in कृषी, जळगाव
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव –  दि १९ फळे, फुले व भाजीपाला या पिकांबरोबरच भात, गहू, मका, सोयाबीन, तूर, कापूस आणि कडधान्ये व तेलबियांची पिके ठिबक संचाच्या सहाय्याने घेतल्यास उत्पादन व उत्पादकतेत प्रचंड वाढ होऊन भारत शेतीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन प्रगत राष्ट्रांच्या यादीत कसा जाऊन बसेल हे विविध पिकांची जळगावच्या जैन हिल्सवरील प्रात्यक्षिके पाहून केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समजून घेतले.

नामदार चौहान यांनी आज जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने जैन हिल्सवर आधुनिक तंत्रज्ञानाने फळबागा व अन्य जी विविध पिके प्रात्यक्षिक म्हणून उभी करण्यात आलेली आहेत त्यांची पाहणी केली. जैन इरिगेशन कंपनीचे चेअरमन अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले. मागील वीस वर्षांपासून जैन हिल्सवर ठिबक संचाच्या आधाराने भाताचे पीक घेतले जाते आहे. ठिबकवर भाताचे पीक येऊच शकत नाही असा बहुसंख्य शेतकऱ्यांचा समज असून तसा प्रश्नही नामदार चौहान यांनी उपस्थित केला व या प्रयोगाबद्दल आश्चर्यही व्यक्त केले. मागील चौदा वर्षातील भाताच्या ठिबकवरील प्रयोगांची माहिती दिल्यानंतर प्रवाही व पाटाने दिलेल्या पाण्यापेक्षा ठिबकवरील भाताचे उत्पादन कितीतरी अधिक येऊन दाणा उत्तम पोसला जातो आणि पिकाची अनावश्यक वाढ रोखली जाऊन ते आडवे पडत नाही असे कंपनीच्या शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हां यापुढील काळात भात पिकविणाऱ्या राज्यांमध्ये ठिबक संचावर भात उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन ना. चौहान यांनी दिले.

भाताबरोबरच हळद, आले, जैन स्वीट ऑरेंज, डाळिंब, आंबा व जैन संत्रा यांची नवीन तंत्रज्ञानाचा व टिश्यूकल्चरचा वापर करून उत्तम, सकस, दर्जेदार रोगमुक्त व व्हायरस फ्री रोपे कलमे जैन इरिगेशन कंपनी कशी तयार करते याची कृषिमंत्र्यांनी पाहणी करून माहिती घेतली. ग्रीनहाऊसमध्ये वाढविलेल्या केळी बागेला समक्ष त्यांनी भेट देऊन यासंबंधीचा व्हिडीओही त्यांनी स्वतःच्या आवाजात व्हायरल केला. हवामान बदल आणि तापमान वाढीच्या संकटातून शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर बंदिस्त व नियंत्रित वातावरणात म्हणजे ग्रीनहाउस, पॉलिहाऊस, शेडनेटमध्ये क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारची पिके कशी घेतली पाहिजेत यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. ‘सिक्स इन वन’ तंत्रज्ञान उष्ण वातावरणात ऊसासारख्या पिकाला कसे उपयोगी पडून उपादन वाढते हे देखील त्यांनी जैन हिल्सवर अनुभवले.

उष्ण व कोरड्या वातावरणात काळी मिरीचे पीक कसे सुंदर येते आणि हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग व क्लायमेट न्यूट्रल आलू टयूबर (बटाटा बियाणे) कसे तयार होते व शेतकऱ्यांसाठी ते कसे फायदेशीर ठरते याचे प्रात्यक्षिकही नामदार चौहान यांनी जैन हिल्सवर पाहिले.

या भेटीच्यावेळी ना. चौहान यांच्या समवेत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे (फलोद्यान) अतिरीक्त महासंचालक डॉ. बी. व्ही. पटेल, राज्याचे फलोद्यान संचालक अंकुश माने, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे डॉ. विजय दोहरे, सहसचिव प्रियरंजन दास, जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेमध्ये जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन आणि डॉ. के. बी. पाटील, डॉ. बी.के. यादव, डॉ. अनिल ढाके, डॉ. अनिल पाटील व बी. डी. जडे यांनी भाग घेतला. कंपनीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची यावेळी मंत्री महोदयांना माहिती देण्यात आली.

आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, फ्युचर फार्मिंग आणि विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित शेतीची कास धरली तरच आपला देश प्रगतीच्या दिशेने जाऊ शकेल असा ठाम विश्वास ना. चौहान यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Previous Post

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

Next Post

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif