• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

जळगाव महानगरपालिकेत प्रथमच गुढीपाडव्याचा जल्लोष

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 19, 2026
in जळगाव, महापालिका, सनउत्सव उपक्रम
महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : मराठी नववर्षाचे स्वागत आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी, १९ मार्च रोजी अत्यंत उत्साही वातावरणात गुढी उभारण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मनपा परिसरात भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरण पाहायला मिळाले.

 

*विधीवत पूजन आणि गुढीची स्थापना*

गुरुवारी सकाळी १० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विधीवत गुढीपूजन करण्यात आले. यावेळी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा यांच्यासह भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*महापुरुषांना अभिवादन आणि परिसर स्वच्छता*

गुढी उभारल्यानंतर महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच मनपा प्रांगणातील लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची विशेष स्वच्छता करण्यात आली असून, सर्वच ठिकाणी माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली आहे.

 

*भरगच्च उपस्थिती आणि सजावट*

या सोहळ्यासाठी संपूर्ण मनपा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, ॲड. शुचिता हाडा, नितीन सपके, जयश्री पाटील, रेश्मा काळे, मंगला चौधरी, पूजा जगताप, रीटा सपकाळे, कलाबाई शिरसाळे, पियुष कोल्हे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, विजय बांदल, कविता शिवदे, राजेंद्र घुगे पाटील, माधुरी बारी, निलेश तायडे, ऋतिक ढेकळे, रबियाबी खान यांसह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

तीन दिवस राहणार रोषणाई

गुढीपाडवा ते महानगरपालिका स्थापना दिन असा दुहेरी उत्सव जळगावकर अनुभवणार आहेत. यानिमित्त १९ ते २१ मार्च या कालावधीत मनपा इमारत आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये झगमगाटी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

“मराठी संस्कृतीचे जतन करणे आणि आपल्या महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मनपाच्या इतिहासात हा सण पहिल्यांदाच अशा पद्धतीने साजरा होत असल्याचा आनंद आहे.”

— दीपमाला काळे, महापौर.

बातमी शेअर करा !
Tags: अभिवादनगुढीपाडवागुढीपूजनदीपमाला काळेनगरसेवकांची उपस्थितीमहापालिकामहापुरुषमहापौर
Previous Post

“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

Next Post

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला* महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 16, 2026
जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

October 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif