• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home घटना

पर्यटन विकास प्रकल्पात हलगर्जीपणा; स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी

पाळधीतील साई भक्त निवास बांधकामस्थळी दुर्घटना; दोन मजुरांची प्रकृती गंभीर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 16, 2026
in घटना, जळगाव ग्रामीण
पर्यटन विकास प्रकल्पात हलगर्जीपणा; स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

पर्यटन विकास प्रकल्पात हलगर्जीपणा; लोखंडी पाइपऐवजी लाकूड वापरल्याने स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी

पाळधीतील साई भक्त निवास बांधकामस्थळी दुर्घटना; दोन मजुरांची प्रकृती गंभीर

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव पाळधी ता. धरणगाव – येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या भक्त निवासाच्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या या कामात लोखंडी पाइपऐवजी लाकूड व बल्ल्या वापरल्याने स्लॅब कोसळल्याची बाब समोर आली असून यात सात मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली. जखमी मजुरांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साई बाबा मंदिर पाळधी परिसराचा विकास पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून या परिसरात विविध बांधकामांची कामे सुरू आहेत. मात्र स्लॅबचे काम सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

घटनेनंतर जखमी मजुरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना आवश्यक असलेली सुरक्षा साधने, हेल्मेट, सुरक्षा बूट उपलब्ध करून देण्यात आली होती का, तसेच कामगारांचा विमा काढण्यात आला होता का, याबाबतही आता चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, स्लॅबला आधार देण्यासाठी अखंड लोखंडी पाइप वापरणे आवश्यक होते, मात्र त्या ठिकाणी लाकूड व बल्ल्या वापरण्यात आल्याने स्लॅब पत्त्यांच्या घरासारखा कोसळला आणि ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

 

◼ लोखंडी पाइप वापरायला हवे होते – ट्रस्ट सदस्य

पाळधी येथील साईबाबा मंदिरातील भक्त निवासाचे बांधकाम शासनाच्या महाराष्ट्र टुरिसम डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत करण्यात येत आहे. या कामाचा ठेका कंत्राट पद्धतीने देण्यात आला आहे.

स्लॅब मोठा व उंच असल्याने त्याला लोखंडी पाइपचा मजबूत आधार देणे आवश्यक होते, मात्र त्या ठिकाणी लाकूड वापरण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती साईबाबा मंदिर ट्रस्टचे सदस्य सुनील झवर यांनी दिली.

बातमी शेअर करा !
Tags: धरणगावपर्यटन विकासपाळधीभक्त निवाससाई मंदिरहलगर्जीपणा
Previous Post

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोनवणे-ठाकरे गटावर गुन्हा!

Next Post

दबावाला बळी न पडता नियमांनुसार काम करा –उपमहापौर मनोज चौधरी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दबावाला बळी न पडता नियमांनुसार काम करा –उपमहापौर मनोज चौधरी

दबावाला बळी न पडता नियमांनुसार काम करा –उपमहापौर मनोज चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif