• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव

जळगाव पेसच्या क्षितीज वारके व अथर्व चव्हाण यांचा महापौर दीपाली काळे यांच्या हस्ते सत्कार

NSEJS मध्ये ; फिजिक्स-केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये राज्यात टॉपर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 15, 2026
in गौरव, जळगाव
जळगाव पेसच्या क्षितीज वारके व अथर्व चव्हाण यांचा महापौर दीपाली काळे यांच्या हस्ते सत्कार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव –  पेस आयआयटीअँड मेडिकल  जळगावच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता ९ वीतील विद्यार्थी क्षितीज वारके याने नॅशनल स्टॅंडर्ड एक्सामिनेशन इन जुनिअर सायंस (NSEJS) परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे जळगाव शहरातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

तसेच अथर्व चव्हाण (इयत्ता १२ वी) याने फिजिक्स आणि केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये स्टेट टॉपर होण्याचा मान मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ओरिओन स्कूल च्या प्राचार्या सुषमा कंची याही कार्यक्रमास उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते क्षितीज वारके आणि अथर्व चव्हाण या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर दीपाली काळे आणि प्राचार्या सुषमा कंची यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. तसेच जायीष्णू IIT गुरुकुल च्या संचालिका सविता वाणी यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून यश कसे संपादन करता येते याबाबत मार्गदर्शन केले.

◼ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

विद्यार्थ्यांसाठी ACE of PACE प्रवेश व शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्च आणि २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना १०% ते ४०% तसेच ७०% पर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण झाली असून उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !
Tags: अथर्व चव्हाणआयआयटीक्षितिज वारकेगुरुकुलजळगावपेसपेस आय आय टीमहापौर दीपमाला काळेसविता वाणी
Previous Post

NIF ग्लोबल जळगावच्या विद्यार्थ्यांची ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये निवड

Next Post

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोनवणे-ठाकरे गटावर गुन्हा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोनवणे-ठाकरे गटावर गुन्हा!

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोनवणे-ठाकरे गटावर गुन्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif