• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

NIF ग्लोबल जळगावच्या विद्यार्थ्यांची ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये निवड

फॅशन व इंटेरियर डिझाईन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय फॅशन उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव – संचालिका संगीता पाटील

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 15, 2026
in जळगाव, यश निवड
NIF ग्लोबल जळगावच्या विद्यार्थ्यांची ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये निवड
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव –  येथील एनआयएफ ग्लोबल – संगीता अॅकॅडमीमधील तीन विद्यार्थ्यांची देशातील प्रतिष्ठित Lakmé Fashion Week मध्ये निवड झाली आहे. जळगावमध्ये गेल्या २१ वर्षांपासून डिझाईन शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय फॅशन मंचावर काम करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.

या निवडीत लाभिका अमरचंद जैन, हिमिशा राजेश अग्रवाल आणि अजीज हकीमुद्दीन बूटवाला या विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना फॅशन उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. हा प्रतिष्ठित फॅशन कार्यक्रम १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान Jio World Convention Centre, Mumbai येथे आयोजित करण्यात येणार आहे.

Lakmé Fashion Week मध्ये देशभरातील नामांकित तसेच नवोदित फॅशन डिझायनर आपली नवीन कलेक्शन सादर करतात. या मंचावर विद्यार्थ्यांना उद्योगातील तज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळते.

संस्थेत शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच औद्योगिक प्रशिक्षण, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल शिक्षण यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच फॅशन उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख मिळते.

संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आतापर्यंत २७ विद्यार्थ्यांनी New York Fashion Week मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून १० विद्यार्थ्यांनी London Fashion Week आणि Dubai Fashion Week या आंतरराष्ट्रीय फॅशन मंचांवर आपल्या डिझाईन्स सादर केल्या आहेत.

या यशामध्ये एनआयएफ ग्लोबल जळगाव टीमचे सदस्य लक्ष्मी मलभारी, पुरबी फासे, तेजस्विनी कांबळे, मानसी जैन, मतीन कसार आणि अर्चना राठी यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले.

◼ विशेष चौकट

  1. “डिझाईन क्षेत्राला अर्थसंकल्पातून प्रोत्साहन; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी”

संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी सांगितले की, अलीकडील राष्ट्रीय अर्थसंकल्पात डिझाईन, क्रिएटिव्ह इंडस्ट्री आणि कौशल्य विकास क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे फॅशन, टेक्सटाईल आणि इंटेरियर डिझाईन क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर विचार करून सर्जनशील आणि कौशल्याधारित क्षेत्रात आत्मविश्वासाने

बातमी शेअर करा !
Tags: Nif ग्लोबलइंटरियरऔद्योगिक प्रशिक्षणजळगावडिझायनरफॅशनफॅशन विकसंगीता अकॅडमी
Previous Post

बारावी परीक्षा काळात ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स सेवा

Next Post

जळगाव पेसच्या क्षितीज वारके व अथर्व चव्हाण यांचा महापौर दीपाली काळे यांच्या हस्ते सत्कार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव पेसच्या क्षितीज वारके व अथर्व चव्हाण यांचा महापौर दीपाली काळे यांच्या हस्ते सत्कार

जळगाव पेसच्या क्षितीज वारके व अथर्व चव्हाण यांचा महापौर दीपाली काळे यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif