• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

निंभोरा कृषी विद्यालयात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 13, 2026
in सामाजिक
निंभोरा कृषी विद्यालयात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

निंभोरा कृषी विद्यालयात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.

नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जागतिक महिला दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निंभोरा येथील कृषी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार पाटील होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती ज्योतीताई बोडे यांच्या हस्ते झाले. विशेष प्रमुख अतिथी म्हणून अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्तीसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा राज्य सचिव प्रा. संजय मोरे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्यचे चीफ डायरेक्टर प्रल्हादभाऊ बोडे, अँटी करप्शन राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य विवेक बोडे, शर्मिला महाले व मनीषा बावस्कर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला.
यावेळी प्रा. संजय मोरे यांनीही आपल्या भाषणात महिलांच्या योगदानाचा गौरव केला. त्यांनी राजमाता जिजाऊ आणि रमाबाई आंबेडकर यांच्या त्याग व कार्याचा उल्लेख करत समाज परिवर्तनात महिलांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात ज्योती बोडे, प्रल्हाद बोडे, राजीव बोरसे, शर्मिला महाले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशनतर्फे उपस्थित महिलांचा शाल, श्रीफळ, बुके, रुमाल व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विजयकुमार पाटील, प्रल्हाद बोडे, प्रा. संजय मोरे, राजीव बोरसे, उपप्राचार्य विवेक बोडे, शर्मिला महाले, मनीषा बावस्कर, सुनीता मोरे, रोशनी मोरे, सरला चौधरी, ज्योत्स्ना महाले, ममता महाले, मयुरी बोडे, डॉ. धनराज बावस्कर, जितेंद्र भावसार, योगेश बऱ्हाटे, जितेंद्र कोळंबे, रोहित तायडे, सनी मोरे तसेच विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय मोरे यांनी केले, तर डॉ. धनराज बावस्कर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा !
Previous Post

भाजप कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!

Next Post

बारावी परीक्षा काळात ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स सेवा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
बारावी परीक्षा काळात ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स सेवा

बारावी परीक्षा काळात ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif