नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – श्रीशिक्षणाच्या प्रणेत्या आणि महिला शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त (दि. १० मार्च) भारतीय जनता पक्षाच्या जीएम फाउंडेशन येथील कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, माजी महापौर सीमा भोळे तसेच प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत महिला शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.
या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी उदय भलेराव, दीपक परदेशी, अरविंद देशमुख, महेश चौधरी, ललित बडगुजर, सचिन बाविस्कर, विजय वानखेडे, प्रकाश पंडित, पंकज जैन, आशिष सपकाळे, सुरेश सोनवणे, किरण भोई, दिलीप लाडवंजारी, रेखा वर्मा, वंदना इंगळे, भाग्यश्री चौधरी, माधुरी हांडे, रोहित सोनवणे आदी उपस्थित होते.
तसेच मंडळाध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, अतुल बारी, संदीप धंधोरे, महेश पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा नितू परदेशी, युगधरा साळुंखे, रेखा कुलकर्णी, उषा परदेशी, संगीता पाटील, जितेंद्र चव्हाण, विजय बांदल, सुनील भारंबे, अश्विन सैंदाणे, स्वप्नील साखळीकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणप्रेरणेचा आदर्श घेऊन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.







