• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव

उद्यापासून ५ वा,आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल!

जेष्ठ अभिनेते मनोज जोशी, अभिनेता आरोह वेलणकर व अभिनेत्री सुरभी हांडे ठरणार पुरस्काराचे मानकरी…

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 27, 2026
in गौरव, जळगाव, फेस्टिवल
उद्यापासून ५ वा,आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – अजिंठा फिल्म सोसायटी आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल उद्या २८ व १ मार्च २०२६ रोजी जळगावात कान्ह ललित कला केंद्र, एम.जे. कॉलेज परिसर येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उत्साह शिगेला पोहोचला आहे. चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उ‌द्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे.

यंदा या महोत्सवाचे ५ वे वर्ष असून देशभरातील २० राज्यांमधुन तसेच विदेशातून या महोत्सवासाठी शॉर्टफिल्म डॉक्युमेन्ट्रि, कॅम्पस फिल्म, बाल फिल्म सहभागी झाल्या आहेत. तज्ञ परिक्षकांमार्फत परिक्षण करुन यातील निवडक ८० शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे. देशभरातील सुमारे ३०० युवा फिल्म मेकर्स यानिमिताने जळगावात येत आहेत. त्यामुळे जळगावकर नागरिकांना विविध विषयांवरील गुणवतापूर्ण लघुपट, माहितीपटांची मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवाच्या निमिताने चित्रपट क्षेत्रातील अनेक गणमान्य कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण परिसराला दादासाहेब फाळके चित्र नगरी असे नाव देण्यात आले आहे तर स्क्रिनींग सभागृहांना अभिनेते धर्मेंद्र देओल अभिनेत्री संध्या शांताराम व अभिनेत्री प्रिया मराठे यांची नावे देण्यात आली आहेत. दि. २८ रोजी या सर्व कक्षांच्या उ‌द्घाटन व फिल्म स्क्रिनींग ने स ९:०० वा. महोत्सवाचा शुभारंभ होईल. महोत्सवात निवडक ८० चित्रपटांचे प्रदर्शन दोन दिवसांत तिनही कक्षात करण्यात येणार आहे.

दुपार सत्रात ११:३० ते १२:३० या वेळात ‘चित्रपट आणि समाज जागरण ‘या विषयावर जेष्ठ चित्रपट अभ्यासक तथा संस्कार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. अभिजित गोखले यांचा मास्टर क्लास होणार आहे. तर दुपारी ०३ ते ०४

महोत्सवाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र शासन, फिल्म सिटी, जैन उ‌द्योग समुह, श्री. रामलाल चौबे ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्व नागरिक, रसिक श्रोते तथा चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छित तरुणांसाठी पुर्णपणे मोफत असणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचा जळगावकर नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे, कान्ह कला ललित केंद्राचे शशिकांत वडोदकर, फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल भोळे, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, सहसचिव डॉ. सुचित्रा लोंढे, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, उपाध्यक्ष, पंकज सोनवणे, अॅड प्रसाद गोडबोले तथा चित्रसाधना प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: अजिंठा फिल्म सिटीअभिनेतेअभिनेते आरोह वेलणकरअभिनेते मनोज जोशीअभिनेत्रीअभिनेत्री सुरभी हांडेज्येष्ठ अभिनेतेदेवगिरीफेस्टिवलशॉर्ट फिल्म
Previous Post

कोल्हापूरच्या अनुराधा भोसले यांना “डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार” जाहीर

Next Post

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif