• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंदोलन

जळगावात भाजप महिला मोर्चाचे काँग्रेसविरोधात आंदोलन!

कोर्ट चौकात महापौरांसह भाजप महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 24, 2026
in आंदोलन, जळगाव
जळगावात भाजप महिला मोर्चाचे काँग्रेसविरोधात आंदोलन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाची दखल घेतली जात असताना आणि ‘जागतिक AI Impact Summit’ सारख्या महत्त्वपूर्ण परिषदेत भारताच्या भूमिकेचे कौतुक होत असताना, काँग्रेस व युथ काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात जळगावात भाजप महिला मोर्चाने तीव्र भूमिका घेत जाहीर निषेध आंदोलन छेडले. आंदोलनाच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला.

 

‘जागतिक AI Impact Summit’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आपली भक्कम भूमिका मांडत जागतिक समुदायाचे लक्ष वेधले आहे. भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात असताना काही राजकीय पक्षांकडून आंदोलनाच्या माध्यमातून देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना भाजप महिला मोर्चाने व्यक्त केली. जग भारताकडे आशेने पाहत असताना देशांतर्गत राजकारणासाठी अशा प्रकारे आंदोलन करणे ही देशविरोधी मानसिकता असल्याचा आरोप यावेळी कुरण्यात आला.या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर यांच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ११:३० वाजता न्यायालय चौक (कोर्ट चौक) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जाहीर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलनात घोषणाबाजी करत काँग्रेस व युथ काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

 

या आंदोलनात जळगाव शहरांच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा नीतू परदेसी, महिला मोर्चा उपाध्यक्षा ज्योती भानुदास बर्गे, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, गायत्रीताई राणे, प्रतीक्षा कैलास सोनवणे, वैशालीताई पाटील, तसेच सोशल मीडिया संयोजक पुनम तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याशिवाय छाया सारस्वत चिटणीस, मनीषा नाले, सुमन मराठे, विद्या पाटील, तृप्ती पाटील, नयना दुसाने आदी महिला कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

 

भारतीय जनता पार्टी महानगर पदाधिकाऱ्यांमध्ये उदय भालेराव, विशाल त्रिफळी, नितीनदादा इंगळे, राहुल वाघ यांची उपस्थिती होती. युवा मोर्चा पदाधिकारी महेश पाटील, आकाश मोरे, हर्षल सिखवाल, अमित माळी, उन्मेष चौधरी, निलेश बाविस्कर, भूषण काकडे, हर्षल सोनवणे, अनुराज मराठे, हितेश वाणी आदी कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून भविष्यात अशा प्रकारच्या कृतींना अधिक तीव्र उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: आंदोलनकाँग्रेसकोर्ट चौकजळगावजागतिक AI परिषदपदाधिकारीभाजपा महिला मोर्चा
Previous Post

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील : सेवेतून घडलेले नेतृत्व!

Next Post

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी!

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif