• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा'चा उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 23, 2026
in जळगाव, सामाजिक
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, दि. २३ – थोर समाजसुधारक, स्वच्छता आणि सेवाभावाचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले.

 

समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्या कृतीतून समाजप्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या कार्यालयात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या सेवाभावी आणि समाजजागृतीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “स्वच्छता, शिक्षण आणि माणुसकीचा संदेश देणारे गाडगे महाराजांचे विचार आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी आहेत,” असे त्यांनी सांगितले. संस्थापक महासचिव भगवान सोनार यांनी, गाडगे महाराजांच्या सामाजिक चळवळीची माहिती देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी यांनी आपल्या मनोगतात, संत गाडगे महाराजांनी समाजातील सर्व घटकांसाठी काम केले. त्याच प्रमाणे पत्रकारांनी देखील काम करावे, असे आवाहन केले.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक खजिनदार ललित खरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव तालुका सचिव योगेश सुने, जळगाव शहर उपाध्यक्ष निखिल मोरे, शहर सचिव योगेश चौधरी, लालचंद अहिरे, विकास चव्हाण, मनोज जोगी, किशोर शिंपी आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

 

यावेळी समाजसेवा, स्वच्छता, सामाजिक सलोखा आणि जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प पत्रकारांनी केला. या उपक्रमामुळे पत्रकारांमध्ये सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली असून, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचारांना उजाळा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Tags: गर्जना ग्रामीण पत्रकार संघटनाजयंती उत्सवजळगावपदाधिकाऱ्यांची हजेरीसंत गाडगे महाराज
Previous Post

शिरसोलीला शिवजयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद!

Next Post

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील : सेवेतून घडलेले नेतृत्व!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील : सेवेतून घडलेले नेतृत्व!

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील : सेवेतून घडलेले नेतृत्व!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif