• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आठ दिवसात समस्यांचे निरसन करण्याचे आदेश !

नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 19, 2026
in जळगाव, राजकारण
आठ दिवसात समस्यांचे निरसन करण्याचे आदेश !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दालनात प्रभाग १३ मधील प्रलंबित प्रश्न आणि तक्रारींबाबत महापौरांच्या उपस्थितीत बुधवारी १८ रोजी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य, पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या समस्यांवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “पुढील काळात तक्रारी येता कामा नयेत, अन्यथा कारवाईबाबत विचार केला जाईल,” असा सज्जड दम महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

 

बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य विभागाच्या कामकाजावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेविका सुरेखा तायडे यांनी घंटागाडीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “घंटागाडीचे ड्रायव्हर कोण आहेत आणि त्यांचे मार्ग काय आहेत, याची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्या. सफाई कामगार नियमित येत नाहीत,” अशी तक्रार त्यांनी केली.

 

वैशाली पाटील यांनी गटारींच्या स्वच्छतेचा मुद्दा मांडला. “गटारी नियमित साफ होत नाहीत आणि काढलेला कचरा तसाच पडून राहतो. महिला कामगार कचरा गोळा करून निघून जातात, पण तो उचलणार कोण?” असा सवाल त्यांनी केला. तर प्रफुल्ल देवकर यांनी आदर्श नगरातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधले.

 

यावर सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांनी सांगितले की, प्रभाग १३ मध्ये ७,४१० घरे असून कामगारांची यादी निश्चित आहे. कामात कसूर करणाऱ्यांवर दंड केला जात असून, येत्या ५ दिवसांत अपडेट केलेली यादी लोकप्रतिनिधींना दिली जाईल.

 

पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून नितीन सपके म्हणाले, “दौलत नगर, संभाजी नगर, रायसोनी नगर भागात पाणी नियमित मिळत नाही. गौरी हाईट्स परिसरात पाण्याचा दाब (प्रेशर) अत्यंत कमी असतो. आपल्याला लोकांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवायचे आहेत,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, दौलत नगर हा भाग उंचावर असल्याने तांत्रिक अडचण येते, ती सोडवण्याचे काम सुरू आहे. तसेच सिंगल कनेक्शन घेतल्यास पाण्याचा फोर्स वाढेल, असेही त्यांनी सुचवले.

 

*पथदिव्यांचा अंधार आणि महापौरांचे निर्देश*

काव्यरत्नावली ते महाबळ रस्ता आणि लांडोरखोरी उद्यान परिसरात पथदिवे वारंवार बंद राहत असल्याचा मुद्दाही नितीन सपके यांनी उपस्थित केला. महापौर दीपमाला काळे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. उन्हाळा जवळ येत असल्याने पाण्याचे नियोजन आताच करा. प्रभागातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक नगरसेवकांना तातडीने द्या. पथदिवे वेळेवर सुरू आणि बंद झालेच पाहिजेत. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.

 

या बैठकीला प्रभागाचे चारही नगरसेवक स्थायी समिती सदस्य नितीन सपके, नगरसेविका सुरेखा तायडे, वैशाली पाटील, प्रफुल्ल देवकर यांच्यासह पाणीपुरवठा, पथदिवे व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव बातमीदीपमाला काळेनगरसेवक आक्रमकपथदिवे बंदपाणीपुरवठाप्रभाग क्रमांक 13महापौर जळगाव
Previous Post

अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम !

Next Post

शिवतीर्थावर मध्यरात्रीच्या महाआरतीला शिवभक्तांचा जनसागर उसळला!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिवतीर्थावर मध्यरात्रीच्या महाआरतीला शिवभक्तांचा जनसागर उसळला!

शिवतीर्थावर मध्यरात्रीच्या महाआरतीला शिवभक्तांचा जनसागर उसळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif