• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शिवतीर्थावर मध्यरात्रीच्या महाआरतीला शिवभक्तांचा जनसागर उसळला!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवा पर्व फाउंडेशन व नगरसेवक सुनील खडके यांच्या वतीने भव्य आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 19, 2026
in जळगाव, शिवजयंती उत्सव
शिवतीर्थावर मध्यरात्रीच्या महाआरतीला शिवभक्तांचा जनसागर उसळला!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

शिवतीर्थावर मध्यरात्रीच्या महाआरतीला शिवभक्तांचा जनसागर उसळला!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवा पर्व फाउंडेशन व नगरसेवक सुनील खडके यांच्या वतीने भव्य आयोजन

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात शिवभक्तांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजित महाआरतीसाठी हजारो शिवभक्त रस्त्यावर उतरले होते. शिवभक्तांच्या “जय भवानी, जय शिवाजी”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

शिवजयंतीनिमित्त जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री महाआरती करण्यात आली. या महाआरतीचे आयोजन माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक सुनील खडके आणि युवा पर्व फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक सुनील खडके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी उपमहापौर सुनील खडके म्हणाले, “हा उपक्रम आम्ही गेल्या चार वर्षांपासून सातत्याने राबवत आहोत. यंदाचे पाचवे वर्ष असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री महाआरतीसाठी लोकप्रतिनिधी व तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत.”

मध्यरात्रीच्या या महाआरतीने शिवजयंती उत्सवाला भक्तिभावाचे व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले असून, शिवतीर्थ परिसर शिवमय झाला होता.

बातमी शेअर करा !
Previous Post

आठ दिवसात समस्यांचे निरसन करण्याचे आदेश !

Next Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif