• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

विद्यार्थ्यांनी दिले शाळेला इन्व्हर्टर भेट!

पुढील वर्षी दहावीचे शिक्षण मोफत ; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचेअध्यक्ष प्रशांत नाईक यांची निरोप समारंभात घोषणा. 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 17, 2026
in जळगाव, विशेष बातमी, शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी दिले शाळेला इन्व्हर्टर भेट!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, व आजी माजी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

 

समारंभाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. काही विद्यार्थ्यांनी गीत व मनोगत सादर करून उपस्थितांना भावूक केले.

 

या प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यालयाला इन्व्हर्टर भेट स्वरूपात प्रदान केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. या भेटीमुळे विद्यालयाच्या सुविधां मध्ये भर पडणार असल्याचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत परिश्रम व शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून तरन्नुम मुस्ताक तडवी ह्या विद्यार्थिनीला गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमाला संचालिका अर्चना नाईक ,भागवत सानप, युवराज सानप, जितेंद्र नाईक ,एकनाथ वाघ, पर्यवेक्षिका शितल कोळी ,पर्यवेक्षक निलेश पवार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कविता सानप तर शेवटी आभार प्रदर्शन रूपाली आव्हाड यांनी केले. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी भावनिक व प्रेरणादायी ठरला.

बातमी शेअर करा !
Tags: इन्व्हर्टर भेटजळगावप्रशांत नाईकमेहरुणशाळा निरोप समारंभशैक्षणिक बातमी
Previous Post

निर्भीड पत्रकारितेसाठी चंदन पाटील यांना राज्यस्तरीय सन्मान

Next Post

राज्यस्तरीय परिषदेत पौर्णिमा देशमुख यांचा डंका! 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
राज्यस्तरीय परिषदेत पौर्णिमा देशमुख यांचा डंका! 

राज्यस्तरीय परिषदेत पौर्णिमा देशमुख यांचा डंका! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif