निर्भीड पत्रकारितेसाठी चंदन पाटील यांना राज्यस्तरीय सन्मान ; ऑनलाईन मीडियातून प्रभावी कामगिरी
नशिराबाद | प्रतिनिधी :- जळगाव येथे जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा व बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीबद्दल ऑनलाईन मीडिया ‘पोलीस दक्षता लाईव्ह’ चे संपादक श्री. चंदन पाटील यांना “ज्ञानवंत पत्रकार” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चंदन पाटील यांनी गेल्या वर्षभरात आपल्या पोलीस दक्षता लाईव्हच्य वृत्तांकनातून निर्भीडपणे सामाजिक विषय मांडले. समाजातील विविध समस्या प्रभावीपणे लोकांसमोर आणत त्यांनी सत्ताधारी व विरोधक या दोन्ही घटकांकडे समान परखड भूमिकेतून प्रश्न मांडले. लोकांच्या भावना व अडचणी प्रभावीपणे प्रशासन व संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय व धाडसी पत्रकारितेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना “ज्ञानवंत पत्रकार” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारामुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून समाजाप्रती जबाबदार व अभ्यासू पत्रकारितेचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे







