• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

मुरूम चोरीप्रकरणी कारवाईऐवजी माझ्यावरच गुन्हा!

अन्यायाविरुद्ध लढाई सुरूच – आ.एकनाथराव खडसे ; सावदा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल प्रकरण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 12, 2026
in जिल्हा, विशेष बातमी
मुरूम चोरीप्रकरणी कारवाईऐवजी माझ्यावरच गुन्हा!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – शासकीय मुरूम चोरीप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याऐवजी जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधीवरच गुन्हा दाखल केला जात असल्याने, हे प्रशासनाचे अपयश असून अन्यायाविरुद्ध आपली लढाई सुरूच राहील, अशी ठाम भूमिका माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.

सावदा परिसरात सुमारे अडीच महिन्यांपूर्वी ४० ते ५० हजार ब्रास शासकीय मुरूम चोरी झाल्याची तक्रार पुराव्यासह करण्यात आली होती. संबंधित व्यक्तीने व्हिडिओ व ऑडिओ स्वरूपात पुरावे सादर करूनही सुरुवातीला पोलिसांनी ही तक्रार महसूल विभागाकडे वर्ग केली. डिसेंबर महिन्यात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरच इरिगेशन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, एफआयआर होऊनही तपासात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप आ.खडसे यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर अडीच महिने उलटूनही मुरूम चोरांवर कारवाई का झाली नाही, याचा जाब विचारण्यासाठी आ.खडसे सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी उद्दाम वर्तन करत, “मी माझ्या पद्धतीने चौकशी करतो, मला कोणाचे बंधन नाही,” असे उत्तर दिल्याचा आरोप खडसे यांनी केला. संवादादरम्यान काही अपशब्द वापरले गेल्याने त्यांनी माफीही मागितली होती.

 

मात्र, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे व भ्रष्टाचाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याची भूमिका घेतल्यानंतर, सूडबुद्धीने आपल्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप आ.खडसे यांनी केला आहे.

 

“शासनाचा मुरूम चोरीला गेला, त्याचे ठोस पुरावे असूनही दोषींवर कारवाई होत नाही. उलट, भ्रष्टाचारावर आवाज उठवला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. हा अन्याय असून याविरोधात मी कायदेशीर लढाई लढणारच,” असे खडसे यांनी स्पष्ट केले. मुरूम चोरीप्रकरणाचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Tags: Jalgaon Political Newsपोलीस निरीक्षक उद्दामपणामुरूम चोरी प्रकरणसावदा पोलीस ठाणे
Previous Post

गोदावरी कॉलेजची आकांक्षा डोंगरे ‘मिस प्राईड’ फायनलिस्ट

Next Post

लेवा महिला अधिवेशन ही गौरवशाली बाब मान्यवरांचा सुर..

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लेवा महिला अधिवेशन ही गौरवशाली बाब मान्यवरांचा सुर..

लेवा महिला अधिवेशन ही गौरवशाली बाब मान्यवरांचा सुर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif