• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

इम्पिरियल स्कूल येथे चिमुकल्यांची “कृष्ण लीला”

वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा ; संस्थेचे अध्यक्ष इंजी नरेश चौधरी यांनी केले मार्गदर्शन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 10, 2026
in जळगाव ग्रामीण, वार्षिक स्नेहसंमेलन
इम्पिरियल स्कूल येथे चिमुकल्यांची “कृष्ण लीला”
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव /पाळधी – येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी व इंपिरियल प्री प्रायमरी स्कूल, जळगाव यांचा दि. 07 रोजी, संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने “कृष्ण लीला” हा प्री- प्रायमरी विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे चेअरमन, इंजि. श्री नरेश चौधरी, सौ प्रियांका सोनी, सौ वैशाली झाल्टे, सौ कविता सोनार तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, जे आता उच्च पदस्त म्हणून कार्यरत आहेत असे तेजपाल पाटील, पूर्वेश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृष्ण लीलेवर आधारित नृत्यनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, राधा संग च्या रासलीला, मटकी फोड अशा विविध प्रसंगांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा, रंगीत सजावट आणि सुरेख संगीतामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, तसेच भारतीय संस्कृतीची ओळख होते. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, शाळेचे कार्यकारी अधिकारी श जी. डी. पाटील, प्राचार्य विवेक रुपनर,  भाग्यश्री आळंदे,  विद्या पाटील यांनी केले होते. शेवटी श्री चंद्रकांत तायडे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. “कृष्ण लीला” या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे शाळेत आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बातमी शेअर करा !
Tags: इम्पिरियल स्कूल पाळधीकृष्ण लीला कार्यक्रमशालेय सांस्कृतिक कार्यक्रम
Previous Post

ॲड. विजय भास्कर पाटील यांचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला.

Next Post

“अशोकभाऊ” आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
“अशोकभाऊ” आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ

“अशोकभाऊ” आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif