• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

“अशोकभाऊ” आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचा जीवनप्रवास

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 10, 2026
in Uncategorized, जळगाव, वाणिज्य वार्ता
“अशोकभाऊ” आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

“अशोकभाऊ”  आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगावच्या विकासाशी जैन उद्योग समूह हे नाव अतूटपणे जोडलेले आहे. देश-विदेशात कार्यरत असलेला जैन उद्योग समूह हा औद्योगिक प्रगतीचा एक महत्त्वाचा अध्याय ठरला आहे. जैन उद्योग समूहाचे पायाभूत रोप श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांनी रोवले आणि त्याचे रूपांतर एका विशाल वटवृक्षात झाले. त्यांनी घेतलेला वसा आज जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भवरलालजी जैन समर्थपणे पुढे चालवत आहेत.

आज त्यांचा वाढदिवस असून सर्वत्र ते “अशोकभाऊ जैन” या नावाने परिचित आहेत. जळगावच्या विकासप्रक्रियेत जैन उद्योग समूहाचे योगदान मोलाचे असून, त्याची ओळख जागतिक पातळीवर निर्माण झाली आहे.

त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर देवेंद्र पाटील यांनी शब्दांतून भावना व्यक्त केल्या आहेत.

जीवनाच्या प्रवासात काही व्यक्ती

फक्त सोबत चालत नाहीत,

तर वाट दाखवतात, सावली देतात

आणि थकलेल्या पावलांना आधार होतात…

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे असेच एक नाव आहे, ज्याचा उच्चार होताच विश्वास जागा होतो. पितृतुल्य अशोकभाऊ खऱ्या अर्थाने सर्वांचे आधारवड आहेत.

त्यांच्या शब्दांत मायेची ऊब आहे,

तर कृतीत कर्तव्याची निष्ठा आहे.

कोणाच्याही यशात ते पुढे नसतात,

पण प्रत्येक यशामागे त्यांचा हात असतो.

क्रीडा असो वा आरोग्य,

शिक्षण असो वा धर्म,

सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहांत

ते सातत्याने आशेचा दीप प्रज्वलित करतात.

प्रोत्साहन देताना ते वेळ, श्रम वा साधनांची मोजदाद करत नाहीत; कारण त्यांच्यासाठी समाज म्हणजेच कुटुंब आहे. राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांसाठी ते सुविधा, साहित्य आणि संधींचा पूल उभारतात, स्वप्नांना पंख देतात आणि ठामपणे म्हणतात —

“तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.”

आई कांताईंच्या मायेचा ओलावा आणि श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या संस्कारांचा दीप आजही त्यांच्या विचारांत तेवत आहे. वसा जपत त्यांनी वारसा अधिक उजळवला आणि मूल्यांची मशाल पुढील पिढीकडे सोपवली.

अशोकभाऊ म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे—

ते एक आधार आहेत,

एक संस्कार आहेत,

आणि अनेकांच्या जीवनात शांत पण तेजस्वी उपस्थिती आहेत.

अनेक जीवनांच्या अंधारात ते आजही आशेचा उजेड पेरत आहेत…

— देवेंद्र पंढरीनाथ पाटील

📞 ९४०४९५५२४५

बातमी शेअर करा !
Tags: अशोकभाऊ जैनजळगाव विकासजैन उद्योग समूहभवरलालजी जैन वारसा
Previous Post

इम्पिरियल स्कूल येथे चिमुकल्यांची “कृष्ण लीला”

Next Post

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif