• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील!

रा काँ.शरद पवारपक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 9, 2026
in Uncategorized, जिल्हा, राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव | प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून, त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याला नवी दिशा देणारी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने कल्पिता पाटील यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले असून, दि.५ फेब्रुवारी रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

 

कल्पिता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनिष्ठ, सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवती काँग्रेसच्या माध्यमातून केली असून, विविध पदांवर जबाबदारीने काम करत पक्षसंघटनेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

विशेष म्हणजे, कल्पिता पाटील या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरल्या होत्या. २०१३ मध्ये कल्याणेहोळ गावच्या सरपंचपदाची धुरा त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळत गावविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम केले. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

२०१६ मध्ये दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या परिषदेत भारतातील ५ व्यक्तींची निवड झाली होती त्यात कल्पिता पाटील यांचा सहभाग होता.

 

पक्षवाढीसाठी त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक काम केले असून, विविध आंदोलने, निदर्शने आणि लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या संघर्षांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची त्यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी राहिली आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता.

 

नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कल्पिता पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कल्पिता पाटीलजिल्हाध्यक्षपदी नियुक्तीराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष
Previous Post

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात!

Next Post

ॲड. विजय भास्कर पाटील यांचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
ॲड. विजय भास्कर पाटील यांचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला.

ॲड. विजय भास्कर पाटील यांचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif