• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

पद्मालयच्या जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह!

निर्घृण खुनाचा संशय ; तालुक्यात खळबळ

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 5, 2026
in Uncategorized, क्राईम, जिल्हा
पद्मालयच्या जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय ; तालुक्यात खळबळ

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा निर्घृण खून असल्याचे स्पष्ट होत असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना जंगल परिसरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत महिलेचा देह कंबरेपासून वरच्या भागात पूर्णपणे जळालेला असून, त्यामुळे तिची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे बिअरची बाटली आढळून आली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत हा गुन्हा केला असावा किंवा महिलेला गुंगीचे पेय देऊन तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खून दोन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येत असल्याने हा खून अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे.

 

एरंडोल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील तसेच शेजारील तालुक्यांतील बेपत्ता महिलांच्या नोंदी तपासून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पद्मालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: पद्मालय जळगाव एरंडोल पोलीस अज्ञात मृतदेह हत्या प्रकरण गुन्हेगारी बातम्या
Previous Post

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार !

Next Post

महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी विराजमान! 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी विराजमान! 

महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी विराजमान! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif