• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार !

कंपनीच्या उत्पन्नात १७.४ टक्क्यांची वाढ

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 5, 2026
in Uncategorized, जिल्हा, वाणिज्य
जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्यLive न्यूज नेटवर्क 

जळगाव, ४ (प्रतिनिधी) – कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ तिसऱ्या तिमाहीचे (Q3FY26) आणि नऊ महिन्यांचे (9MFY26) एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. त्यात कंपनीच्या उत्पन्नात (महसूलात) १७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न ₹१,५९८ कोटींवर पोहोचले असून EBITDA (व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा) ₹१६८ कोटींचा दिसतो आहे. या निकालामुळे बाजारात कंपनीच्या वाढीच्या क्षमतेबाबत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

 

तिसऱ्या तिमाहीत कंपनीची चांगली कामगिरी – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन

“चालू आर्थिक वर्षाच्या या तिमाही कंपनीची चांगली कामगिरी झाली आहे त्यामुळे ती अत्यंत मजबूत ठरली आहे. सर्व व्यवसाय विभागांमध्ये दुहेरी अंकातील वाढ नोंदविण्यात आली आहे. अलीकडील जीएसटी दरांतील कपातीमुळे मागणीला चालना मिळाली असून महसूल वाढीस त्याची मदत झालेली आहे. कार्यक्षम अंमलबजावणी व रोख शिस्तीमुळे कार्यभांडवल चक्रात लक्षणीय सुधारणा झाली असून ऑपरेशन्समधून मजबूत रोख प्रवाह निर्माण झाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत महसुलात सातत्यपूर्ण वाढ झाली असून मार्जिनमध्येही सुधारणा दिसून येत आहे. किरकोळ व्यवसायावर वाढलेला भर, कार्यक्षमता सुधारणा आणि खर्च नियंत्रण याचे हे सकारात्मक परिणाम आहेत.”

 

केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा खर्चामुळे पाइपिंग व्यवसायाला गती मिळेल, तर सौर कृषी पंप व ग्रामीण विकासावर केंद्रित धोरणामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या कृषी-प्रक्रिया विभागाने (JFFFL) नामांकित आणि अग्रगण्य शीत पेय कंपनी बरोबर नवीन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले असून Q4FY26 पासून नवीन प्रकल्पातून उत्पन्न योगदान अपेक्षित आहे. तसेच टोमॅटो प्युरी उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही कंपनी शाश्वत वाढ व भागधारकांना मूल्यनिर्मिती करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Tags: जैन इरिगेशन Jain Irrigation Systems तिमाही निकाल आर्थिक बातम्या कृषी उद्योग जळगाव उद्योग बातम्या
Previous Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘तानाजी’ चित्रपटाचे प्रदर्शन

Next Post

पद्मालयच्या जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पद्मालयच्या जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह!

पद्मालयच्या जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif