• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतात विलीन!

बारामती येथे शासकीय इमामात पुत्र पार्थ व जय  यांनी दिला मुखाग्नी;  दादांच्या अंगरक्षकांचा अश्रूचा बांध फुटला.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 29, 2026
in ब्रेकिंग, महाराष्ट्र, विशेष बातमी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतात विलीन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार या दोघा पुत्रांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

 

बारामतीसह महाराष्ट्र सुन्न झाला. समर्थकांनी ”अजित दादा अखेरचा दंडवतघालत आपल्या लाडक्या दादाला निरोप दिला.यावेळी वातावरण अत्यंत भावनिक झालेले होते या ठिकाणी दादांचे अंगरक्षक यांनी निरोप देताना अखेर त्यांच्या अश्रूंचा बाण फुटून ते ढसा ढसा रडू लागले. हे बघून इतर उपस्थित पदाधिकारी नेते यांचे डोळे देखील पन्हावले.

 

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील,

यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण वाहिली.

 

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपल!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त हे अत्यंत धक्कादायक आहे. भल्या पहाटे अशी दु:खद बातमी महाराष्ट्राला ऐकायला मिळेल अशी स्वप्नातही कुणी कल्पना केली नव्हती. अजितदादा तरूण कार्यकर्त्यांसाठी नेहमीच आधारवड होते. कार्यकर्त्यावर निस्सीम प्रेम करणारे दादांचे नेतृत्व होते. राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिकवेळा मांडण्याचा त्यांच्या नावे विक्रम राहिला आहे. अर्थ व नियोजमंत्री म्हणून राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे काम त्यांनी बारकाईने केले. स्पष्टवक्ता, प्रचंड निर्णयक्षमता, निडर असे त्यांचे व्यक्तीगुण सांगता येतील. दादांच्या अकाली जाण्याने तरूण कार्यकर्त्यांचा आधारस्तंभच कोसळला आहे.

– डॉ. केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस भाजपा.

 

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #news #baramati #ajitdadapawarnews#ncp
Previous Post

प्रेमध्वज महाआरतीने उत्सवाची सुरुवात.

Next Post

पोलिस कवायत मैदानावर केसीईच्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट पथसंचलन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पोलिस कवायत मैदानावर केसीईच्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट पथसंचलन!

पोलिस कवायत मैदानावर केसीईच्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट पथसंचलन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif