• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

बोगस मतदानाचा संशय, मतदाराला मारहाण केल्याने  पियुष पाटीलांवर गुन्हा दाखल

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 19, 2026
in Uncategorized, जळगाव, निवडणूक
जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

 

बोगस मतदानाचा संशय, मतदाराला मारहाण केल्याने  पियुष पाटीलांवर गुन्हा दाखल

 

जळगाव, दि.१८ – जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असून महापौर महायुतीचा होणार आहे. गट स्थापन केल्यानंतर याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत जनतेने माझ्याबाजूने, विकासाला कौल दिला आहे. मतदानाच्या दिवशी जो प्रकार घडला आणि माझ्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.

 

प्रभाग ५ मधून विजयी झाल्यानंतर नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विष्णू भंगाळे म्हणाले की, जळगावात महायुती म्हणून आम्ही लढलो आणि आम्हाला भरपूर यश मिळाले. जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. आम्ही आमचे नेते गुलाबराव पाटील आणि महायुतीचे सर्व नेते, आमदार यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणून जळगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विरोधकांनी खोटे बोलावे पण रेटून बोलावे असे करून टीका केली. निवडणूक आता पार पाडली असून झालेला विषय आम्ही सोडून दिला आहे, असे विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

 

*जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल*

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर गुरुवारी दुपारी मोठा राडा झाला. बोगस मतदान करीत असल्याच्या संशयावरून अपक्ष उमेदवार अॅड.पीयूष नरेंद्र पाटील यांनी एका मतदाराला मतदान केंद्राबाहेर ओढून आणत कमरेत लाथ घालून मारहाण केली. फिर्यादी सुनील श्रीधर भंगाळे (रा. वाघळी, ता. चाळीसगाव) यांना मारहाण करण्यात आली होती. या राड्यामुळे सुनील भंगाळे आणि त्यांचे सहकारी पराग लक्ष्मण पाटील हे मतदानापासून वंचित राहिले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वाहनाची तोडफोड, गुन्हा दाखल

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्या वाहनावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक करून मागील काच फोडून नुकसान करण्यात आले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चालकाने दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार नगरात राहणारे भंगाळे यांच्या घराशेजारी असलेल्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे कार (क्र. एमएच ३९, एबी ९९९९) उभी करण्यात आली होती. गणेश भानुदास भोळे (रा.श्रद्धा कॉलनी) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Tags: #Jalgaon #JalgaonMunicipalCorporation #Mahayuti #JalgaonPolitics #ElectionNews #NavrajyaLive#brekingnews #jalgaonnews
Previous Post

महापालिकेतील विजयाने देवाभाऊ मामांवर खुश  

Next Post

जळगावमध्ये सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइज सुरू

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावमध्ये सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइज सुरू

जळगावमध्ये सोमाणी टाईल्स आणि बाथवेअरचे फ्रेंचाइज सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif