• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापालिकेतील विजयाने देवाभाऊ मामांवर खुश  

आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाचे मुंबईत मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 18, 2026
in जळगाव, महापालिका रणसंग्राम
महापालिकेतील विजयाने देवाभाऊ मामांवर खुश  
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मुंबई/जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी करत सर्व ४६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या अभूतपूर्व यशानंतर आमदार भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भोळे यांचा विशेष सत्कार करून जळगावच्या विकासासाठी नवा संकल्प सोडला.

 

जळगाव महापालिकेच्या ४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार केला होता. आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणुकीची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली होती. ‘विकास’ आणि ‘पारदर्शक प्रशासन’ या मुद्द्यांवर त्यांनी मतदारांशी संवाद साधला. निकालाअंती, सर्वच्या सर्व ४६ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने राजकीय वर्तुळात या विजयाची मोठी चर्चा होत आहे. विरोधकांना एकाही जागेवर आपले खाते उघडता आले नाही.

 

या मोठ्या विजयाची माहिती देण्यासाठी आणि पुढील नियोजनासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी भोळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या निवडणूक नियोजनाचे कौतुक केले.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, जळगावकरांनी भाजपवर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आमदार भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल.

 

याबद्दल आमदार भोळे म्हणाले की, हा विजय माझा नसून जळगावातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली साथ आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्याचे हे फळ आहे. आता आमचे लक्ष फक्त आणि फक्त जळगावच्या सर्वांगीण विकासावर असेल.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #Jalgaonnews #जळगाव #जळगावमहापालिका #भाजपविजय #राजूमामाभोळे #देवेंद्रफडणवीस #BJPJalgaon #46OutOf46 #HistoricVictory #JalgaonPolitics #MaharashtraPolitics
Previous Post

सागर पार्कवर बहिणाबाई महोत्सवाचे दि २३ते २७ रोजी आयोजन 

Next Post

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 22, 2026
माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

October 22, 2026
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

October 22, 2026
ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

October 22, 2026

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री उत्सव व रावण दहन उत्साहात संपन्न.

October 20, 2026
जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif