नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव २०२६ चे दि.२३ ते २७ जानेवारी रोजी (५ दिवस) सागर पार्क येथे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचे ११ वर्ष असून हा महोत्सव भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष दीपक सराफ व भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी दिली. ते नटवर शॉपिंग मॉल येथील भरारी फाउंडेशन च्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते..
यावेळी, तुषार महाजन, राजेंद्र खडके, विनोद ढगे आदी उपस्थित होते. यंदाचे ११ वे वर्ष असून यावर्षी चे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील सत्यनारायण बाबा मोर्य, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, सुप्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज यांचे पर्यावरणावर जागृतीपर किर्तन, शाळा, विद्यालय व कॉलेज च्या स्थानिक कलावंतांसाठी संस्कृती पर विविध कार्यक्रम, आज दिवस जळगावकर रसिकांसाठी भरभरून कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. त्याचबरोबर खानदेशातील विविध बचत गटाचे खाद्यपदार्थांचे, व विविध वस्तूंचे १५० स्टॉलअसणार आहे.
या महोत्सवात तमाम नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भरारी फाउंडेशन व क्रेडाई तर्फे करण्यात आले आहे.







