• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर ; तक्रार ११२ या हेल्पलाईनवर करा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 10, 2026
in Uncategorized, क्राईम, विशेष बातमी
नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने नायलॉन अथवा सिंथेटिक मांजा विक्री व वापराविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आदेश जारी करत यावर्षी केवळ जप्तीपुरती मर्यादित न राहता, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११० अन्वये संबंधितांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ (Attempt to Culpable Homicide) हा गंभीर, अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. नायलॉन मांजा मानवी जीव व पशुपक्ष्यांस अत्यंत घातक असून गळा कापल्याने दुचाकीस्वार व नागरिकांचे बळी गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. विक्रेत्यांना या धोक्याची पूर्ण जाणीव असूनही नफ्यासाठी विक्री केल्यास, हे कृत्य नवीन कायद्यानुसार थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ या व्याख्येत बसते, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

विशेष मोहीम राबविणार

प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत साध्या वेशातील विशेष पथके नेमण्यात आली असून ती ग्राहक बनून दुकानांची तपासणी करतील. तसेच गोदामे व घरांमध्ये साठवणूक केलेल्या नायलॉन मांजावर धाडसत्रे राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पतंग विक्रेत्यांना BNS व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कलम १४९ (BNSS 168) अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

नागरिकांना आवाहन

नागरिक व पालकांनी मुलांना नायलॉन मांजा खरेदी करून देऊ नये. हा मांजा तुटत नसल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होतात. तसेच विजेच्या तारांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.

 

तक्रार कुठे करावी?

आपल्या परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ ११२ या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

 

लागू होणारी कायदेशीर कलमे

BNS कलम ११० : सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न.

BNS कलम २२३ : जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन.

पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ व १५ : ५ वर्षांपर्यंत शिक्षा व १ लाख रुपयांपर्यंत दंड.

बातमी शेअर करा !
Tags: #breking #JalgaonMIDC #DPlusGrade #UdaySamant #EknathShinde #GulabraoPatil #MahayoutiRoadshow #JalgaonNews #MaharashtraPolitics #IndustrialDevelopment #EmploymentGeneration
Previous Post

जळगाव एमआयडीसीला”डी प्लस”चा दर्जा – उद्योगमंत्री उदय सामंत 

Next Post

जळगावात भाजपच्या बंडखोरांची हकालपट्टी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात भाजपच्या बंडखोरांची हकालपट्टी

जळगावात भाजपच्या बंडखोरांची हकालपट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif