• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगावात भाजपच्या बंडखोरांची हकालपट्टी

माजी. नगरसेविका कांचन सोनवणे यांच्यावरील कारवाई मागे; अल्टिमेटची मुदत संपण्यापूर्वीच केली कारवाई

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 10, 2026
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
जळगावात भाजपच्या बंडखोरांची हकालपट्टी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज

जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी कापल्यानंतर भाजपत मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून आली आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. बंडखोरांना भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, अल्टीमेटमचा कालावधी संपण्यापूर्वीच भाजपने २७ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई केली आहे. तर माजी नगरसेविका कांचन सोनवणे यांच्या पाठिंब्याने त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली.

 

बुधवारी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक १३ संदर्भात स्वतंत्र पत्र प्रसिद्धीस दिले होते. त्यात प्रभाग १३ मधील बंडखोरांवर कारवाईचा इशारा दिला होता. परंतु १९ पैकी ८ ते ९ प्रभागात बंडखोरी असताना केवळ प्रभाग १३ साठीच पत्र का काढले गेले? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी गुरूवारी भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह २७ जणांवर हकालपट्टीच्या कारवाईचे पत्र जारी केले आहे. या कारवाईनंतर बंडखोरीवर लगाम लागेल असे बोलले जाते आहे.

यांच्यावरील कारवाई मागे

भाजपाच्या उमेदवार प्रतीक्षा कैलास सोनवणे यांना भाजपाच्या बंडखोर उमेदवार कांचन विकास सोनवणे यांनी पाठिंबा दिला. यावेळी आ. सुरेश भोळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर भरती सोनवणे, प्रतीक्षा सोनवणे, विशाल त्रिपाठी, आदी उपस्थित होते.  कांचन विकास सोनवण यांची पक्षाकडून केलेली हकालपट्टी रद्द होणार आहे.

 

यांच्यावर झाली कारवाई  ⬇️

 

बातमी शेअर करा !
Previous Post

नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

Next Post

प्रभाग १३ मध्ये महायुतीचीच चर्चा….

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रभाग १३ मध्ये महायुतीचीच चर्चा….

प्रभाग १३ मध्ये महायुतीचीच चर्चा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif