• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

नाशिकला मंत्री गिरीश महाजन यांना पक्षप्रवेशावरून कार्यकर्त्यांनी घातला घेराव.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेशावरून दांगडो; आमदार देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर  

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 25, 2025
in Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नाशिकला मंत्री गिरीश महाजन यांना पक्षप्रवेशावरून कार्यकर्त्यांनी घातला घेराव.

 

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेशावरून दांगडो; आमदार देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमध्ये आज माजी आमदार, माजी महापौरासह 5 मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश संपन्न झाले. या पक्षप्रवेशावर नाशिकमधीलच भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेला अनुपस्थित राहत विरोध केला होता. मात्र, तरीही मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रवेश झाले. यावेळी, मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशााठी भाजप कार्यालयात येत असताना, भाजपच्या निष्ठावंतांनी त्यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातला होता. आता, देवयानी फरांदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते.

 

नाशिकमधील पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची परस्थिती निर्माण झाली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक आमदार खासदार भाजपचे आहेत. आज दिनकर पाटील यांनी प्रवेश केला आहे, दिनकर पाटील यांनी आता कुठे जाऊ नये, असे या पक्षप्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी म्हटले. मनसे, काँग्रेस, उबाठाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे प्रवेश केला आहे, मी सर्वांचे स्वागत करतो. मुख्य प्रवाहात त्यांनी प्रवेश केला आहे, भाजपवर विश्वास आहे, नेतृत्वार विश्वास आहे, त्यामुळे या सर्वांनी प्रवेश केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व आले आहेत, बाहेर आता कोणीही राहिले नाही. 100 च्या वर आमचे नगरसेवक निवडून येतील, आता चार वाढल्याने 104 होतील, असेही महाजन यांनी म्हटले. तर, देवयानी फरांदे यांनी मी नाराज नाही असे म्हटले, पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू लपले नाहीत.

 

मी विरोध करण्यापेक्षा ते माझे मत होते, बबलू शेलार यांचा प्रेवश केला होता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आमचं पॅनल तयार होतं. आमदार म्हणून मला वाटत होते ते मी बोलले, कोणाला माझा विरोध नव्हता, असे म्हणत भाजप नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, मी नाराज नाही असे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते. मागील 40 वर्षांत मी स्वतःसाठी आजवर कधीही जाहीर भूमिका घेतली नाही, मी पक्षाची निष्ठावान आहे. सर्वानीच नेते व्हायचे आहे, मग कार्यकर्ते कोण राहणार हे मला वाटतं, असेही देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या गोंधळावर आणि नाराजीवर बोलताना म्हटले.

 

 

मी नाराज नाही, पण…; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या

 

नाशिकमधील पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयाबाहेर काही

 

वेळ गोंधळाची परस्थिती निर्माण झाली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक आमदार खासदार भाजपचे आहेत.

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगाव महापालिकेत भाजप- सेनाची अखेर झाली युती.

Next Post

स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101वी जयंतीला पक्ष प्रवेश.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101वी जयंतीला पक्ष प्रवेश.

स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101वी जयंतीला पक्ष प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif