जळगाव महापालिकेची निवडणूक भाजप सेना सोबत लढणार.
भाजप शिवसेना नेत्यांची युतीची घोषणा; राष्ट्रवादी अन्नभिन्न
नवराज्य Live न्युज नेटवर्क.
जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप व शिवसेना युती होणार की नाही अशी चर्चा होती. तर भाजपातील कार्यकर्ते व इच्छुकांना युती होऊ नये असे वाटत होते. मात्र आज या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असून भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी एका खाजगी हॉटेलात पार पडलेल्या बैठकीनंतर बैठकी नंतर युतीची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादी बरोबर अजून जागेचा तिढा असून त्यांच्याशी बोलणी सुरू आहे.भाजप आणि शिवसेना यांची युती मात्र निश्चित असल्याचे यावेळी नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काल हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे भाजप व शिवसेना नेत्यांची बैठक झाली या बैठकीत भाजप व शिवसेना युतीवर चर्चा झाली व जागावाटपचे देखील ठरले असून शिवसेनेची 23 जागेची मागणी आहे. उर्वरित जागा भाजप लढणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी ला किती जागा सोडायचे आहेत याबाबत अजून चर्चा सुरू असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.






