• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला 

ज्येष्ठ फिजिशियन डॉ.संजय महाजन यांचे निधन: माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांचे प्रतिपादन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 23, 2025
in Uncategorized, जळगाव, सांत्वन
विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : डॉ. संजय महाजन यांनी अध्यापनाच्या माध्यमातून भविष्यातील पिढी घडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. समाजाला एका अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेला मुकावे लागले आहे, अशा शब्दात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

 

शहरात गेल्या साडेतीन दशकांपासून आपल्या वैद्यकीय सेवेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे आज पहाटे ४ वाजता मुंबईत उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने जळगावमधील वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. संजय महाजन यांनी गेल्या ३५ वर्षांपासून जळगाव शहरात अविरतपणे वैद्यकीय सेवा दिली.

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय देखील त्यांनी १५ वर्षे अध्यापन केले. तसेच रुग्णालयात रुग्णसेवा केली. एक निष्णात फिजिशियन म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. केवळ उपचार करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, रुग्णांना धीर देणारा एक आपुलकीचा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. १५ वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव पाहता, त्यांनी अनेक सक्षम डॉक्टर्स घडवले यात शंका नाही.

 

१५ वर्षे सतत अध्यापन करणे हे त्यांच्या विषयावरील प्रभुत्वाचे आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले विद्यार्थी आज विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देत असतील, हाच त्यांचा खरा वारसा आहे, अशा शब्दात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

*”आयएमए”ची प्रतिक्रिया*

 

डॉ. संजय महाजन यांनी रुग्णसेवा करताना नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासली. आयएमएला त्यांनी विविध उपक्रमात नेहमी सहकार्य केले. डॉ. संजय महाजन हे मनमिळावू होते. त्यांच्या निधनाने कुशल फिजिशियन हरपले, अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य पदाधिकारी डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. विलास भोळे, जळगांवचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #DrSanjayMahajan #SeniorPhysician #MedicalLoss #Jalgaon #DoctorAndTeacher #MedicalEducation #आदर्श_डॉक्टर #श्रद्धांजली #गोदावरी_फाउंडेशन #आयएमए
Previous Post

युती झाल्यास,ये रे.. माझ्या मागल्या…

Next Post

दोनवर्ष कैदच्या शिक्षेला स्थगिती न घेतल्यास अपात्र.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दोनवर्ष कैदच्या शिक्षेला स्थगिती न घेतल्यास अपात्र.

दोनवर्ष कैदच्या शिक्षेला स्थगिती न घेतल्यास अपात्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif