• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

युती झाल्यास,ये रे.. माझ्या मागल्या…

भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ; कार्यकर्त्यांची युतीला ना?

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 22, 2025
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
युती झाल्यास,ये रे.. माझ्या मागल्या…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

 

जळगाव (योगेश सुने चीफ एडिटर) -निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारांचे तिकिटासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे.यात भाजपाच्या तिकिटासाठी इच्छुकांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर भाजपात आरामाची संख्या वाढल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. तर दुसरीकडे भाजप युती करण्याच्या उंबरठ्यावर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीवेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आयारामांना प्रवेश दिला गेला होता.

 

 

28 नगरसेवक फुटले होते तोच कित्ता पुन्हा गिरवणार का?

भाजपाने 57 जागांवर विजय मिळवत. एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु त्यानंतर भाजपातून 28 नगरसेवक फुटले होते व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देत महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. तसे पाहता या वेळेस देखील भाजपाने तोच कित्ता गिरवत आयारामांना पक्षात प्रवेश दिला तितकेच नव्हे, तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा जे जामिनावर आहेत. त्यांना देखील प्रवेश दिला. यामुळे भाजपात नाराजीचा सूर देखील उमटला होता. व आमदार सुरेश भोळे यांचा विरोध झूगारून मंत्री महाजन यांनी शिवसेनेतील नगरसेवक नितीन लढढा व पाईप चोरी घोटाळ्यातील गुन्हा दाखल असलेले माजी उपमहापौर व माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह 23 जणांना पक्षप्रवेश दिला होता.

 

इच्छुक उमेदवारांचा गेम करण्यासाठी युतीचे अस्र….

पक्ष संघटनेत गेल्या 20 ते 25 वर्षापासून काम करत असलेले निष्ठावंत कार्यकर्ते, निवडून येणारे स्टॅंडिंग नगरसेवक व भारताचे तिकीट मिळेल यासाठी प्रवेश करणारे इच्छुक उमेदवार व नेत्यांनी शब्द दिल्यानंतर इच्छुक असलेले उमेदवार या सर्वांनची संख्या पाहता सर्व इच्छुकांना भाजपाचे तिकीट मिळणे अशक्य आहे. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी एका बाणातून दोन पक्षी करण्यासाठी इच्छुकांचा गेम करण्यासाठी युती करण्यास अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.

भाजपाच्या बूथ रचनेचा फायदा युतीतील शिंदे सेनेला …

इतर पक्षांची बूथ रचना व भाजपाची बूथ रचना जर बघितली तर संदर्भात भाजपा सर्वात आघाडीवर असलेला पक्ष आहे.भाजपाचा कार्यकर्ता असो वा पदाधीकारी आजही जे कार्यकारणीतील पदाधिकारी आहेत ते बूथ रचनेवर काम करत आहेत. आमदार, मंत्री जरी असले तरी ते बूथ चे काम पाहतात. त्यामुळे भाजपाकडे सर्वात जास्ती कार्यकर्त्यांची फळी व पदाधिकाऱ्यांची फळी असल्याने ते बूथचे कार्य ते प्रभावीपणे राबवतात. याचा फायदा जास्तीत जास्त मतदान खेचण्यात यश मिळते. मात्र युती झाल्यास या बूथ रचनेचा फायदा युतीतील असलेल्या घटक पक्षांना निश्चित होईल व त्यांना मतदानासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. हे देखील भाजपाचे कार्यकर्ते जाणून असल्यानेच ते युतीसाठी अनुकूल दिसत नाही. व सत्ता येईल हे निश्चित आहे परंतु भविष्यात देखील पक्ष फुटू शकतो. अशी देखील शंका भीती कार्यकर्त्यांनी जाणून आहेत.असे असले तरी निष्ठावान कार्यकर्ता हा पक्षाच्या किंवा पक्षश्रेष्ठीच्या विरोधात बोलायाला तयार नाही. कारण कार्यकर्ता हा संस्कारी आहे त्यामुळेच तो सहन करत आहे.

नुकत्याच झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या भाजपाच्या बरोबरीने जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटात देखील उत्साहाचे वातावरण आहेत त्यातच युती झाली तर शिंदे गटाला याचा जास्त फायदा होईल यात मात्र शंका नाही.

बातमी शेअर करा !
Tags: #BJP #ShivSenaShinde #AlliancePolitics #Jalgaon #JalgaonNews #MunicipalElection #PoliticalUpdate #LocalPolitics #MarathiNews #BreakingNews #NavrajyaLive
Previous Post

भाजपाच्या बरोबरीने आले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून.

Next Post

विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला 

विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif