• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

स्वामी विवेकानंद महाविद्यलयात युवास्पंदन 2025 जल्लोष

स्नेहसंमेलनाचा समारोप

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 20, 2025
in Uncategorized, जळगाव, स्नेहसंमेलन
स्वामी विवेकानंद महाविद्यलयात युवास्पंदन 2025 जल्लोष
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : – येथील के सी ई सोसायटी संचालित मू.जे.महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय स्नेह संमेलन युवा स्पंदन २०२५ उत्साहात संपन्न झाले.

दोन दिवसीय चालू असलेल्या युवास्पंदन च्या दुसऱ्या दिवशी विविध मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात रंगमंचाच्या पुजनाने झाली. यावेळी प्रा डॉ केतन नारखेडे, उपप्राचार्य आर बी ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे , समन्वयक प्रा उमेश पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा वर्षा पाटील व उपप्रमुख प्रा संदिप वानखेडे उपस्थित होते.

 

सुरुवातीला भारतीय प्रादेशिक व पारंपारिक वेशभुषा स्पर्धेने सुरुवात केली गेली. यात भारतातील विविध राज्य तसेच प्रदेशातील लोकपरंपरेचा जागर करीत विद्यार्थ्यांनी सुंदर वेश परिधान केला होता. यावेळी परीक्षक म्हणून तनवी वडोदकर व डॉ पूजा पांडे हे होते.

 

रंगारंग झालेल्या गीतगायन कार्यक्रमांमध्ये 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी परीक्षक म्हणून मंगेश वाघ व अभय गजभिये यांनी कामकाज बघितले.नृत्यप्रकार या स्पर्धेत सोलो, डुएट व ग्रुप डान्स अक्षरा महाजन,राकेश कोळी व अनुष्का परिहार हे या स्पर्धेचे परीक्षक होते.

 

या शैक्षणिक वर्षाचा ‘बेस्ट स्टुडन्ट’ म्हणून इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची साक्षी डिगंबर ढाके या विद्यार्थीनीची निवड करण्यात आली. ‘प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर’ विज्ञान शाखेतून रोहित ब्राह्मणकर, वाणिज्य शाखेतून देवश्री परदेशी, कला शाखेतून वैष्णवी चौधरी व किमान कौशल्य विभागातून राणी जाधव या विद्यार्थ्यांना मिळाला.

 

या कार्यक्रमाचा समारोप वार्षिक पारितोषिक समारंभाने झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲड प्रवीणचंद्र जंगले सहसचिव केसीई संस्था जळगाव हे होते. यावेळी केसीई संस्थेचे शैक्षणिक व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उपप्राचार्य आर बी ठाकरे यांनी शैक्षणिक वर्ष 2025 चा आढावा मांडला. स्नेहसंमेलनप्रमुख वर्षा पाटील यांनी स्नेहसंमेलनाचा आढावा दिला. यावेळी महाविद्यालयाचे शैक्षणिक मासिक ‘युवास्पंदन ‘ याचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.प्राध्यापक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली.

बातमी शेअर करा !
Tags: #kcesosaity#swamivivekanad collge
Previous Post

कोकिळाताईंच्या उमेदवारीसाठी शंभर टक्के प्रयत्नशील.

Next Post

बारी समाजाचा उद्या उपवधू – वर परिचय मेळावा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
बारी समाजाचा उद्या उपवधू – वर परिचय मेळावा

बारी समाजाचा उद्या उपवधू - वर परिचय मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif