नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – भाजपासाठी इच्छुक असलेल्या महिला उमेदवार कोकिळाताई तुकाराम पाटील यांचे समाजात चांगले काम आहे. महिलांच्या भावना पक्षाच्या कोर कमिटी कडे मांडून व कोकिळाताईंना उमेदवारी मिळावी यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील आहोत असे आश्वासन जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी दिले. वीर जवान ग्रुप आयोजित महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी महापौर भरतीताई सोनवणे, भाजप महिला पदाधिकारी रेखा राणा , निमजाई फाउंडेशनच्या शीतल पाटील इच्छुक महिला उमेदवार कोकिळाताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील, राहुल पाटील, शेखर पाटील, तुषार चौधरी गणेश बच्छाव मुकेश पाटील कमलेश पाटील ललित खडके
भूषण भोळे,पप्पू चौधरी, समाधान बारी,महेश पाटील, वीर जवान ग्रुपचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शहरातील शिंपी मंगल कार्यालय येथे वीर जवान ग्रुप तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रभाग क्र 4 मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी नेहा पाटील, छाया पाटील, वर्षा पाटील, पूनम पाटील यांनी उपस्थित महिलांचे हळदी कुंकवाचे औक्षण करून भेटवस्तू दिल्या व कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.







