• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

विवरा येथील युवकाचा मृत्यू हत्या की, आत्महत्या?

नातेवाईकांचा घातपाताचा आरोप; कारवाईच्या मागणीसाठी दोन तास ठिय्या आंदोलन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 18, 2025
in Uncategorized, क्राईम, जिल्हा
विवरा येथील युवकाचा मृत्यू  हत्या की, आत्महत्या?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

ऐनपुर प्रतिनिधी:-  रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हितेश सुनील पाटील (वय २१) हा युवक जळगाव येथे डिप्लोमा शिक्षण घेत होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तो घरातून कुणालाही न सांगता बेपत्ता झाला होता.

रविवारी (दि.14) हितेशची दुचाकी भुसावळ येथील तापी नदी पुलावर आढळून आली होती. यासंदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आज (दि.17) सकाळी सुमारे ११ वाजता स्थानिक मच्छीमारांना तापी नदीत तरंगताना युवकाचा मृतदेह आढळून आला. ही बाब समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “जोपर्यंत या घटनेमागील सूत्रधार कोण आहे आणि कुणी हत्या केली आहे याचा सखोल तपास होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली.

या मागणीसाठी नातेवाईक व मित्रपरिवाराने निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेह सुमारे एक ते दीड तास ठेवून ठिय्या आंदोलन केले. विवरा गावातील नागरिकही मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती.

दरम्यान, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी येऊन नातेवाईक व जमावाची समजूत काढली. सखोल तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यानंतर शोकाकुल वातावरणात विवरा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीसांकडून सुरू असून हा मृत्यू आत्महत्या की हत्या, याबाबतचा सत्य शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Previous Post

वाघोदा बु || येथे श्रीदत्त पालखी सोहळा संपन्न..

Next Post

मनपा निवडणुक प्रमुखपदी आ.राजुमामा भोळे तर प्रभारीपदी आ मंगेश चव्हाण

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मनपा निवडणुक प्रमुखपदी आ.राजुमामा भोळे तर प्रभारीपदी आ मंगेश चव्हाण

मनपा निवडणुक प्रमुखपदी आ.राजुमामा भोळे तर प्रभारीपदी आ मंगेश चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर

July 23, 2026
जळगावात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात!

जळगावात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात!

July 23, 2026
बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif